शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या हंगामाचे स्वप्न ‘अवकाळी’ने भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:59 IST

ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही.

ठळक मुद्देटाकळी बुद्रूकचे शेतकरी कृष्णा दुसाने यांची व्यथाकुणाचे का होईना सरकार येवो व शेतकºयांना मदत मिळो दु:ख काही पाठ सोडायला तयार नाहीयंदाच्या हंगामातून पक्के घर बांधण्याचा होता मानस

मोहन सारस्वतजामनेर, जि.जळगाव : ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही. चांगला हंगाम येईल या भरवशावर यंदा घराची दुरुस्ती करण्याचा विचार होता. निसर्गाला तेही पाहवले नाही. टाकळी बुद्रूक, ता.जामनेर येथील कृष्णा सुरेश दुसाने यांची ही आपबिती.निसर्गाच्या लहरीपणाने यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केवळ नुकसानच झाले नाही तर त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. कृष्णा हे आई शशिकला व पत्नी सोबत वडिलोपार्जित शेती करतात. सात एकरपैकी पाच एकरात कापूस व दोन एकरात ज्वारीची लागवड केली. दीड हजारात ज्वारीचे तर आठ हजारात कापसाचे बियाणे खरेदी केले. लागवडीपूर्वी गावातीलच वि.का. संस्थेकडून ४५ हजारांचे व स्थानिक बचत गटाकडून ४० हजार कर्ज घेतले. बचत गट दोन टक्के व्याज दराने कर्ज देत असल्याने ते परवडते. यामुळे सावकाराकडे जावे लागत नाही, असे कृष्णा सांगतात.गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ काही पिच्छा सोडत नव्हता. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पावसाने मेहरबानी कायम ठेवल्याने हंगाम चांगला येईल, असे वाटत होते. दिवाळीपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने कहरच केला. तोंडाशी आलेला घास हिरावला. १८ ते २० पोते ज्वारी येईल. २५ ते ३० क्विंटल कापूस येईल, अशी अपेक्षा होती. मात्र देवाजीच्या मनात काही वेगळेच होते. ज्वारी तर पूर्णच खराब झाली. चारा म्हणून ढोरंसुद्धा खाणार नाही, अशी परिस्थिती आहे. ८० हजार खर्च झाले. हाती काय येईल ते सांगता येत नाही.ज्वारी हातची गेली. कापूस किती येईल असे विचारता. ते म्हणाले, सात-आठ क्विंटल निघेल असे वाटते. मात्र तीन हजारापेक्षा जास्त कुणी भाव देईल असे वाटत नाही. घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता आहे. रब्बी पेरणीबाबत ते म्हणाले, कोरडवाहू असल्याने शक्य नाही. मग आता पुढे काय? असा प्रश्न करताच ते म्हणतात, मजुरी करून दिवस काढावे लागतील. गेल्या वर्षी पाच एकरात २० क्विंटल कापूस व दोन एकरात १८ पोते ज्वारी निघाली होती.पीक विमा नाही, शासनानेच मदत द्यावीकृष्णा दुसाने यांनी पीक विमा काढला नाही. शासनाकडून पंचनामा झाला. आता त्यांनीच काही तरी नुकसान भरपाई द्यावी. राज्यात सरकारच नाही. कुणाचे का होईना सरकार येवो व शेतकºयांना मदत मिळो, असे ते म्हणाले.कृष्णा यांचे वडील नाही. आईने घर व शेत सांभाळून दोघं भावना मोठे केले. दुर्दैवाने लहान भाऊ सुनील याचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला. त्याचा मोठा आधार होता. गेल्या वर्षी तो गेला. यंदा देवाने असे मारले. दु:ख काही पाठ सोडायला तयार नाही. असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.मातीच्या भिंतीवर पत्रे असून यंदाच्या हंगामातून पक्के घर बांधण्याचा त्यांचा मानस होता.

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर