शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य खेळांची चित्रे बेल्जियममधील प्रदर्शनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 11:57 IST

गिलोरी, विटू दांडू अशा कालबाह्य झालेल्या खेळांच्या चित्रांनी बेल्जियममधील फ्लोरीस लुक जॉस डेव्हरीएन्डेट या शास्त्रज्ञाला अक्षरश: भुरळ घातली. ही चित्रे त्यांनी थेट मागवून घेतली आणि पुढील महिन्यात ते त्याचे प्रदर्शनही भरविणार आहेत.

- चुडामण बोरसेजळगाव : गिलोरी, विटू दांडू अशा कालबाह्य झालेल्या खेळांच्या चित्रांनी बेल्जियममधील फ्लोरीस लुक जॉस डेव्हरीएन्डेट या शास्त्रज्ञाला अक्षरश: भुरळ घातली. ही चित्रे त्यांनी थेट मागवून घेतली आणि पुढील महिन्यात ते त्याचे प्रदर्शनही भरविणार आहेत. चोेपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील कलाशिक्षक कमलेश अशोक गायकवाड यांची ही चित्रे आहेत. या चित्रांची वैशिष्ट्ये म्हणजे जे क्रीडा प्रकार आज कालबाह्य झालेले आहेत. ज्यातून पूर्वी व्यक्तीचा शारीरिक, मानसिक विकास उत्तमप्रकारे व्हायचा व बालकांना मनसोक्त आनंद प्राप्त व्हायचा. तेच प्रसंग या चित्रात यांनी अतिशय जिवंत स्वरूपात मांडण्यात आले आहेत.विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजची पिढी व्हीडीओ गेम, इंटरनेट, मोबाईल, टीव्ही या माध्यमात आनंद व मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते; ‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे बालकांना स्वच्छंद आनंद देणारे खेळप्रकार या चित्रात उभे करण्याचा प्रयत्न गायकवाड यांनी केला आहे.चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे नातेवाईक बेल्जीयममध्ये आहेत. त्यांचा आणि शास्त्रज्ञ फ्लोरीस लुक यांचा परिचय. वरील खेळ प्रकाराची चित्रे महाजन यांनी आपल्या नातेवाईकांना व्हॉटस्अ‍ॅपनी पाठविली. ती त्यांनी फ्लोरीस लुक यांना दाखविली. लूक यांना ही चित्र फारच आवडली आणि चक्क यातील काही चित्रे पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे गायकवाड यांनी ही चित्रे बेल्जीयमला पाठविली आहेत. आता चोपड्याच्या कलावंतांने काढलेली ही चित्रे बेल्जीजमधील एका प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.कमलेश यांचे वडील अशोक गायकवाड हे कलाशिक्षक आहेत. वडिलांकडूनच त्यांना कलेचा वारसा लाभला. कलेची आवड असल्यामुळे कला या विषयातच गायकवाड यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या कुंचल्यातून प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर तसेच अनेक महापुरुषांची व्यक्तिचित्रे, मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला- (जळणाऱ्या ताज हॉटेलवर आपले अश्रू वाहून आग शांत करणाऱ्या श्रद्धांजली प्रतिक असलेल्या मेणबत्या), प्रत्यक्ष निसर्गचित्र, सामाजिक प्रश्नावर आधारीत चित्रे त्यांनी तैलरंग, जलरंग, अ‍ॅक्रेलिक रंग, रंगीत पेन्सिल, पेस्टल कलर या माध्यमात चित्रे साकारली आहेत.