भुसावळ : तालुक्यात जमाते इस्लामी हिंदच्या महिला संघटना, जीआयओ गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशनच्यावतीने पर्यावरण रेखाचित्र स्पर्धा घेण्यात आली.
संस्थेच्यावतीने नाझीमा शाझिया अरशद म्हणाल्या की, सध्याच्या युगात आपण जितकी अधिक झाडे लावू तितकेच आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळेल. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी शरीरात जितकी सामान्य असेल तितकीच असेल. आपल्या सर्वांना पुन्हा भारत हरित करावे लागेल, आपल्याला पुन्हा हरितक्रांती करावी लागेल. म्हणूनच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेकडो झाडे लावून पर्यावरणाचा समतोल स्थिर ठेवण्याच्या पुढाकाराने जमात-ए-इस्लामी हिंद यांनी ५ ते १२ जून दरम्यान पर्यावरण सप्ताह साजरा केला.
११ जून रोजी भुसावळ येथील जमाते इस्लामिक हिंदच्या महिला शाखेत जीआयओ गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रेखाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर बुश्रा परवीन, द्वितीय क्रमांक आयशा मणियार आणि तिसऱ्या क्रमांकावर सय्यद मारिया यांचा समावेश आहे.
विजेत्यांना जीआयओ गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशनतर्फे बक्षिसे देण्यात आली. उर्वरित मुलींना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.