शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

धरणगावचे डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांचा पंतप्रधान मदतनिधीसाठी अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 16:30 IST

नवजात शिशूतज्ज्ञ डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत एक अभिनव उपक्रम राबवून ‘कोरोना’ संकट काळात पंतप्रधान मदत निधीसाठी तीन लाख ६२ हजार रुपये मदत पाठवली आहे.

ठळक मुद्देसंडे हटके बातमीकोरोना इफेक्ट२७६ डॉक्टरांच्या मदतीने उभी केली तीन लाख ६२ हजारांची मदत

शरद बन्सीधरणगाव, जि.जळगाव : येथील सुप्रसिद्ध न्यूओनॉटिलॉजिस्ट (नवजात शिशूतज्ज्ञ) डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत एक अभिनव उपक्रम राबवून ‘कोरोना’ संकट काळात पंतप्रधान मदत निधीसाठी तीन लाख ६२ हजार रुपये मदत पाठवली आहे. त्यांनी लिहिलेले बहुप्रतिक्षित शैक्षणिक पुस्तक न्यूअर इनसाईट्स इन पेरींटालॉजी’ हे त्यासाठी महत्वाचा दुवा ठरले आहे.डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांनी नवजात शिशू वैद्यक शास्त्रात आशिया खंडात नावलौकिक मिळविला आहे. सध्या ते पुणे येथील भारती विद्यापीठात सेवा देत आहेत. त्यांनी आपल्या अभ्यास आणि अनुभवातून लिहलेले ‘न्यूअर इनसाईट्स इन पेरीन्टॉलॉजी’ हे शैक्षणिक पुस्तक बहुप्रतिक्षित आहे. बालरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ यांच्यासाठी ते महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरणार आहे. प्रकाशनापूर्वी या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी डॉ.सूर्यवंशी यांनी उपलब्ध करून दिली आहे. जे निवासी डॉक्टर १०० रु. आणि कन्सल्टंट डॉक्टर २०० रुपयांचे त्यांच्या या योजनेत योगदान देतील त्यांना ही सॉफ्ट कॉपी मिळणार आहे. या माध्यमातून डॉक्टर जे योगदान देतील तो निधी पंतप्रधान मदत निधीसाठी पाठवला जाणार आहे. आजपर्यंत एकूण २७६ डॉक्टरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तीन लाख ६२ हजार रु. निधी गोळा झाला आहे.अजूनही ज्या डॉक्टरांना या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी हवी असेल त्यांनी पीएम फंडात शंभर रुपये पाठवून पावती १िस्र१ंीिीस्र२४१८ं६ंल्ल२ँ@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. त्यांना कॉपी पाठविण्यात येईल.डॉक्टर, नर्सेस चोवीस तास, संपूर्ण देशात या संकटात आपली सेवा बजावत आहेत त्यांचे हे काम बघून जनता त्यांच्याकडे रदेवरुप’ म्हणून पहात आहे. अशा परीस्थितीत डॉ.सूर्यवंशी यांचा हा उपक्रम आगळा वेगळा आणि लक्षवेधी ठरला आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक भविष्यात नवा विक्रम नोंदविणार आहे. परंतु डॉ.सूर्यवंशी यांनी आपल्या स्वत:च्या फायद्याकडे दुर्लक्ष करत ते वैद्यकीय सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. त्यासाठी पंतप्रधान मदत निधीसाठी १०० रु. अट ठेवली आहे. डॉ.सूर्यवंशी आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेतच. शिवाय त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे त्यांच्यातील संवेदनशील डॉक्टरचे दर्शन घडले आहे. धरणगावकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDharangaonधरणगाव