शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीडीसी’कडूनही मनपाला दिलासा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:38 IST

पालकमंत्र्यांसोबतची बैठक झालीच नाही

जळगाव : शहरातील रस्त्यांची झालेली दूरवस्था व वाढत्या खड्ड्यांच्या उपाययोजनांसह मेहरुण तलावाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडून (डीपीडीसी) निधी मिळण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने डीपीडीसीकडून मनपाची निराशा झाली आहे. या सोबतच मनपाशी संबंधित गाळे व हुडको प्रश्नाबाबतही शुक्रवारी संध्याकाळी होणारी बैठकही न झाल्याने गाळेधारकांचाही अपेक्षाभंग झाला आहे.सध्या अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची मोठी दूरवस्था झाली असून खड्ड्यांचेही मोठे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघातांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरवासीयांचा मोठा रोष आहे. त्यात मनपाची बिकट स्थिती व काम करणाऱ्या एजन्सी कमी आहे. त्या मुळे कामे रेंगाळत आहे.या प्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूल, खड्ड्यांबद्दल असलेली नाराजी पाहता एजंसी वाढवून मिळाव्यात, मेहरुण तलाव विकासासाठी निधी मिळावा, हुडको, गाळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र त्या वेळी डीपीडीसीचा मनपाशी संबंध नाही, असे एकनाथराव खडसे यांनी सांगून टाकले. त्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपण यासाठी संध्याकाळी बैठक घेऊ असे सांगितले.विजेचे खांब स्थलांतरण रखडलेशिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी वीज वितरणकडून सहकार्य होत नसल्याची ओरड आहे. या कामासह इतरही ठिकाणचे विजेचे खांब स्थलांतरीत करण्यासाठी ५० लाखाच्या निधीची मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती.संबंध नाही, मात्र मदतीची अपेक्षातसे पाहता मनपाला डीपीडीसीकडून निधी मिळणार नाही, हे मान्य असले तरी मनपाची आर्थिक स्थिती पाहता निधीची तरतूद करण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र निधीबाबत थेट नकार देण्यात आल्याने मनपाच्या पदरी निराशीच आली.या पूर्वी गणेश घाटाला मिळाला आहे निधीमेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी निधीची मागणी केली असता सकारात्मक उत्तर मिळाले नाही. तसे पाहता या पूर्वी मेहरुण तलावावरील गणेश घाटासाठी डीपीडीसीतून निधी मिळालेला आहे. त्यामुळे आताही मेहरुण तलावाच्या कामासाठी निधी मिळणे अपेक्षीत आहे.बैठक झालीच नाहीडीपीडीसीचा मनपाशी संबंध नसल्याचे सांगण्यात आल्याने हुडको, गोळे प्रश्नासंदर्भात संध्याकाळी बैठक घेऊ, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. मात्र संध्याकाळी ही बैठक झालीच नाही. त्यामुळे यावर काहीच चर्चा होऊ शकली नाही.सकारात्मक निर्णय होईलमागण्यांबाबत आपण अद्यापही सकारात्मक आहोत. मेहरुण तलावासाठी निधी मिळेलच. शुक्रवारी संध्याकाळी वेळेअभावी बैठक होऊ शकली नसली तरी पालकमंत्री गिरीश महाजन लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढतील. विशेष म्हणजे या बाबत पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांशीही चर्चा केली आहे. हुडको, गाळे प्रश्नाविषयी दिल्लीत झालेल्या बैठकीतील मुद्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. तेही लवकर निर्णय घेतील- सुरेश भोळे, आमदार .

टॅग्स :Jalgaonजळगाव