शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ काळात जिल्ह्यात गंभीर गुन्हे ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:57 IST

संचारबंदीआधी १४१ तर नंतर अवघे ६२ गुन्हे

सुनील पाटीलजळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू झाला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वावर झालेला आहे. संचारबंदी लागू होण्याच्या एक आठवडाआधी जिल्ह्यात हाणामारी, दंगल, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार यासारखे १४१ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत तर संचारबंदी लागू झाल्यापासून आठवडाभरात हाच आकडा अवघ्या ६२ वर आला आहे. याच कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अन्वये ७१ गुन्हे दाखल झाले आहेत.जिल्ह्यात एकाच आठवड्यात भाग ५ चे कमीत कमी २०० च्यावर गुन्ह्यांची नोंद होत असते. भाग ५ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, दंगल, हाणामारी, बलात्कार, विनयभंग व अपहरण सारख्या घटनांचा समावेश होता. २२ मार्चपासून या घटनांना आळाच बसला आहे. अपवादात्मक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. १५ ते २९ मार्च या कालावधीत हरविलेल्या व्यक्तीबाबत ४८ प्रकरणांची नोंद झाली आहे. १५ मार्चपासून जिल्ह्यात ५६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात अवैध दारु विक्रीचे ९०, जुगाराचे २४, आत्महत्या, अकस्मात मृत्यू ९१ व आगीच्या ५ घटना घडल्या आहेत.रावेर दंगल अपवादसंचारबंदी व जनता संचारबंदी या काळात रावेरची दंगल मात्र याला अपवाद ठरली आहे. चौकशीअंती संचारबंदी याच कारणामुळे येथे दंगल उसळली व त्यात एकानिष्पाप व्यक्तीचा खून झाला. याप्रकरणा सहा गुन्हे दाखल झाले असून ९० च्यावर संशयितांना अटक झालेली आहे. जळगाव शहरातील गुन्हेगारी मात्र कमालीची घटली आहे. चोरी,घरफोड्या, सोनसाखळी लांबविणे, प्राणघातक हल्ला यासारख्या घटनांना आळा बसला आहे. शिवाजी नगरात एक किराणा दुकान फोडल्याचा प्रकार याला अपवाद आहे.अपघाताच्या घटना थांबल्यासंचारबंदी काळात जिल्ह्यात एकही अपघात झाला नाही. रोजच्या अपघाताची आकडेवारी १५ ते २०च्या घरात आहे. विशेष म्हणजे एक दिवसाआड अपघातात जीव जातो. संचारबंदीत अपघाताच्या घटना थांबल्या असून आजारपणही कमी झालेले आहे.रस्त्यावर फिरायला निर्बंध असल्याने अनावश्यक वाहनेच रस्त्यावर दिसत नाही. त्याशिवाय दारुचे दुकाने बंद आहेत. मद्याच्या नशेत अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, त्या थांबल्या आहेत.अशी आहे गुन्ह्यांची स्थिती१५ ते २१ मार्च गंभीर गुन्हे : १४१२२ ते २९ मार्च गंभीर गुन्हे : ६२१५ ते २९ मार्च एकूण गुन्हे : ५६८कोरोना संदर्भातआदेशाचे उल्लंघन : ७१

टॅग्स :Jalgaonजळगाव