शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

संकटात असलेल्या शेतकºयांकडे कर्ज वसुली, वीज बिल वसुलीची सक्ती करू नका - पालकमंंत्री गिरीश महाजन यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:31 IST

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर घेतला जिल्हाभरातील आढावा

जळगाव : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यात गंभीर पीक परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कर्ज वसुली, वीजबिल वसुली, पिक विम्याला लाभ या विषयी शेतकºयांची अडवणूक करू नये, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी दिले.राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महाजन यांनी शनिवारी अधिकाºयांसह यावल तालुक्यातील डांभुर्णी तसेच जळगाव तालुक्यातील विदगाव व ममुराबाद या तीन गावांमध्ये शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीबाबत तातडीची आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.या बैठकीस आमदार चंदूलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.सुट्टी न घेता सात दिवसात पंचनामे पूर्ण कराजिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांचे सरसकट पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. यासाठी पुढील एक आठवडा कोणीही सुट्टी घेवू नये. पंचनामे वेळेत पूर्ण होण्यासाठी यंत्रणेने अधिक वेळ काम करुन वेळेत पंचनामे पूर्ण करावेत. एकही शेतकरी पिकाच्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.अर्ज भरण्यासाठी पीक विम्याच्या पावतीची आवश्यकता नाहीअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत पीक विमा काढलेल्या पावतीची पीक विमा कंपनीकडून मागणी करण्यात येत आहे. अशी बाब अधिकाºयांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता पालकमंत्र्यांनी विमा कंपनीच्या अधिकाºयांना याबाबत जाब विचारुन अशा पावतीची आवश्यकता कशासाठी आहे. शेतकºयांनी पीक विमा घेतल्याची नोंद आपल्याकडे असताना पुन्हा पावतीची मागणी करु नये अशा सूचना दिल्या. त्यावळी पावतीची आवश्यकता नसल्याचे विमा कंपनीच्या अधिकाºयांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे आता शेतकºयांना अर्जासोबत पावती जोडण्याची आवश्यकता नसल्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. तसेच शेतकरी अडचणीत असताना बँकांनी सद्य परिस्थितीमध्ये शेतकºयांकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये. अशा सूचना बँकेच्या अधिकाºयांना दिल्या. त्याचबरोबर वीजबीलाची वसुली थांबविण्यासाठी शासन स्तरावर विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.भरपाई देण्यासाठी दहा हजार कोटींची तरतूदअतिवृष्टिमुळे संपूर्ण राज्यात भीषण परिस्थिती असल्यामुळे शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची सूचना प्रशासनास दिली आहे. तसेच केंद्र शासनाकडेही मदतीची मागणी केली आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याचेही महाजन यांनी सांगितले.धीर सोडू नका, शासन शेतकºयांच्या पाठीशीबैठकीपूर्वी पालकमंत्री महाजन यांनी ममुराबाद, विदगाव, डांभुर्णी आदी गावातील शेतकºयांच्या शेतावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या मका, सोयबीन, कापूस, ज्वारी इत्यादी पीकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच तेथील शेतकºयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. धीर सोडू नका, शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महाजन यांनी या वेळी दिली. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासन एक आठवड्याच्या आत पूर्ण करणार आहे. पावसामुळे शेतकºयांच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकºयांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असेही, महाजन यांनी भेटीप्रसंगी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव