शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा बाजार समिती अब्जाधीश!

By admin | Updated: May 13, 2014 00:04 IST

रवींद्र चौधरी, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आर्थिक वर्षात शेतीमाल खरेदी-विक्रीपोटी या बाजार समितीत एक अब्ज दोन कोटी ८१ लाख ५७ हजार ८२५ रुपयांची प्रचंड उलाढाल झाली आहे.

रवींद्र चौधरी, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती आता लखपती नाही तर थेट अब्जाधीश झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात शेतीमाल खरेदी-विक्रीपोटी या बाजार समितीत एक अब्ज दोन कोटी ८१ लाख ५७ हजार ८२५ रुपयांची प्रचंड उलाढाल झाली आहे. समितीला त्यातून एक कोटी दोन लाख ८१ हजाराचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. वर्षभरात शेतमालाची पाच लाख ४५ हजार ९८ क्विंटल एवढी आवक झाली. बाजार समितीत गेल्या आर्थिक वर्षभरात भुईमूग शेंगा, मिरची, गहू, बाजरी, ज्वारी, दादर, मठ, मूग, उडीद, तूर, हरभरा, मका, तीळ, कुळीथ, चवळी या मालाची आवक झाली. भुईमूग शेंगाची ३३ हजार ३७९ क्विंटल आवक झाली. त्यातून १३ कोटी नऊ लाख ९१ हजार ११० रुपयांची उलाढाल झाली. सरासरी दर तीन हजार ९२४ रु.राहिला. मिरचीची १६ हजार ३३५ क्विंटल आवक झाली असून दोन कोटी ९३ लाख ४६ हजार ५३ रु.ची उलाढाल झाली. सरासरी प्रतिक्विंटलचा दर १७९६ एवढा मिळाला. गव्हाची ३४ कोटी ९० लाख ९२ हजाराची उलाढाल झाली. दोन लाख १५ हगार ६०५ क्विंटल गव्हाची आवक झाली. सरासरी दर १६१९ रु. मिळाला. बाजरीची आवक नऊ हजार ९६ क्विंटल झाली. त्यापोटी एक कोटी १९ हजार ४७९ रुपयांची उलाढाल झाली. सरासरी दर प्रतिक्विंटल १३१५ रुपये असा होता.ज्वारीची आवक २९ हजार ४०८ क्विंटल झाली. त्यातून तीन कोटी २५ लाख १८ हजार ३२४ रुपयांची उलाढाल झाली. दर सरासरी प्रतिक्विंटल ११०६ रुपये मिळाला. दादरची आवक १० हजार २६७ क्विंटल झाली. त्यातून एक कोटी ८२ लाख ६१ हजार ३६७ रुपयांची उलाढाल झाली. सरासरी दर प्रतिक्विंटल १७७९ रुपये मिळाला. मठाची आवक तीन हजार ७५१ क्विंटल एवढी होऊन दोन कोटी १३ लाख १० हजार ६६७ रु.ची उलाढाल झाली. सरासरी दर ५६९४ रु. मिळाला. मुगाची पाच हजार ५१४ क्विंटल आवक होऊन दोन कोटी ५८ लाख ३१ हजार ८४२ रु.ची उलाढाल झाली. सरासरी दर ४८६६ रु.मिळाला. उडदाची आवक ११७ क्विंटल झाली. त्यातून तीन लाख ८५ हजार २९ रु.ची उलाढाल झाली. सरासरी दर ३२९१ रु. मिळाला. तुरीची चार हजार ६०६ क्विंटल आवक झाली. एक कोटी ७० लाख ५५ हजार ४२४ रुपयांची उलाढाल झाली. सरासरी दर ३७०३ रु.मिळाला. हरभर्‍याची ३१ हजार २१३ क्विंटल आवक झाली. तर उलाढाल १६ कोटी ६३ लाख २३ हजार ३८० रु.ची झाली. सरासरी दर ३७२७ रुपये मिळाला. मक्याची एक लाख ८५ हजार ७७१ क्विंटल आवक झाली. तर उलाढाल २२ कोटी ४९ लाख चार हजार ९७१ झाली. सरासरी दर १२१० रुपये मिळाला. तिळाची पाच क्विंटल आवक होऊन उलाढाल ५६ हजार ९०० रुपये झाली. सरासरी दर ११ हजार ३८० रूपये मिळाला. कुळथाची आवक चार क्विंटल होऊन उलाढाल आठ हजार ४०२ रु.ची झाली. सरासरी दर २१०० रुपये मिळाला. चवळीची दोन क्विंटल आवक झाली. तर नऊ हजार ३०० रु.ची उलाढाल झाली. सरासरी दर ४६५० मिळाला. मैलाचा दगड समितीने २०१३-१४ या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच १०० कोटी अर्थात एक अब्ज रुपयांच्या उलाढालीचा ‘मैलाचा दगड’ ओलांडला. तत्पूर्वी २०११-१२ मध्ये समितीची एकूण उलाढाल ५७ कोटी ७३ लाख १२ हजार ६३६ एवढी होती. त्यानंतरच्या २०१२-१३ या वर्षात समितीने आणखी पुढचा पल्ला गाठला. त्या वर्षात एकूण उलाढालीचा आकडा ९४ कोटी १९ लाख ४१ हजार ११९ वर पोहचला.