शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प जळगावच्या ‘वरण-बट्टी’च्या प्रेमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 19:47 IST

गेल्यावर्षी झालेल्या अमेरिकेच्या राष्टपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लीक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. विजयाचे श्रेय त्यांनी अमेरिकन जनतेला न देता चक्क जळगावातील गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळात आयोजित करण्यात येणाºया भंडाºयांना दिले आहे. तसेच त्यांनी जळगाव व असोदा परिसरातील ‘वरण-बट्टी’ व वांग्याच्या भाजीच्या प्रेमात पडले आहेत.

ठळक मुद्देयुट्यूब, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जळगावची वरण-बट्टी जगभरगंमतीशीर व्हिडीओची धमालख्रिस गेल,जयकांत शिखरेलाही आवडते वरणबट्टी

अजय पाटील,

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.३१,गेल्यावर्षी झालेल्या अमेरिकेच्या राष्टपतीपदाच्या  निवडणुकीत रिपब्लीक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. विजयाचे श्रेय त्यांनी अमेरिकन जनतेला न देता चक्क जळगावातील गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळात आयोजित करण्यात येणाºया भंडाºयांना दिले आहे. तसेच त्यांनी जळगाव व असोदा परिसरातील ‘वरण-बट्टी’ व वांग्याच्या भाजीच्या प्रेमात पडले आहेत.  

हे वाचून धक्का बसला ना.  काही जळगावकर युवकांनी नामी शक्कल लढवित डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणांना जळगावच्या अहिराणी भाषेत डब करून, व्हिडीओ तयार केले आहेत. यामध्ये काही युवकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाज डब केला आहे. त्यात ट्रम्प हे आपल्या भाषणात जळगावच्या ‘वरण-बट्टी  व वांग्याची’ भाजीची स्तुती करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ युट्यूब व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण देशभर पसरले आहे. त्यामुळे या व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

२० ते २५ व्हिडीओ केले तयारडोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यानचे, विजयी झाल्यानंतरचे व काही पत्रकार परिषदेतील व्हिडीओ डब केले आहेत. ट्रम्प यांचे असे २० ते २५ व्हिडीओ डब करण्यात आले आहेत. तर याखेरीज ‘नरेंद्र मोदी व ट्रम्प’ भेटी दरम्यानचा व्हिडीओ देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी देखील जळगावच्या ‘वरण-बट्टी’चे कौतुक करत असून, भारताने अमेरिकेला ‘वरण-बट्टी’ निर्यात करण्याचा सल्ला देखील ट्रम्प या व्हिडीओत देत आहे. अशा एकाहून एक गंमतीशिर संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांना पोस्ट केले जात आहे.

ख्रिस गेल,जयकांत शिखरेलाही आवडते वरणबट्टीयुट्यूबवर सर्वात जास्त हे व्हिडीओ अपलोड होत असून, डोनाल्ड ट्रम्प सोबतच वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल, सिंघम चित्रपटातील जयकांत शिखरे, युवराज सिंग यांचे देखील अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करुन ते देखील वरणबट्टीच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे.