ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 30 - डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे कर्ज न फेडल्याप्रकरणी जिल्हाधिका:यांच्या आदेशाने डॉ.वैशाली पंढरीनाथ नेरकर यांचे कृष्णा हॉस्पिटल जप्त करून ते बॅँकेच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, जप्तीसाठी गेलेल्या अधिका:यांच्या अंगावर डॉक्टरांनी श्वान सोडल्याची पथकाची तक्रार आहे. डॉ. वैशाली पंढरीनाथ नेरकर व पुष्पा पंढरीनाथ वाणी यांनी डोंबिवली नागरी सहकारी बँकेतून कर्ज घेण्यासाठी अमळनेर येथील टीपी नं.154 मधील प्लॉट नं.9 (सध्याचे कृष्णा हॉस्पिटल) बँकेकडे गहाण ठेवले होते. वारंवार मागणी करुनही बँकेचे कर्ज फेडले नाही म्हणून बँकेचे अधिकारी भालचंद्र माधव भोळे यांनी वसुलीसाठी ‘दी सिक्युरिटायङोशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अॅसेट्स अॅण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज इंटरेस्ट अॅक्ट 2002’ अन्वये स्थावर मिळकत व जंगम मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी जिल्हाधिका:यांकडे अर्ज केला होता. जिल्हाधिका:यांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांना आदेश देउन ताबा घेण्यासाठी कार्यकारी अधिकारी नेमणुकीचे आदेश दिले.त्यानुसार डोंबिवली बँकेचे अधिकारी भालचंद्र भोळे, प्राधिकृत अधिकारी, अमळनेरचे नायब तहसीलदार प्रशांत वाघ, पोलीस कर्मचारी, महिला होमगार्ड कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेले असता डॉ.वैशाली नेरकर यांनी त्यांच्याशी वाद घालून मिळकतीस कुलूप लावून ठेवले. तसेच त्यांचाकडील श्वान अंगावर सोडल्याची पथकाची तक्रार आहे. अखेर कर्मचा:यांनी कुत्र्यांवर ताबा मिळवून त्यांना बांधले. त्यानंतर हॉस्पिटलचे व्हीडीओ चित्रीकरण करुन पंचनामा केला. हॉस्पिटलचा ताबा बँकेच्या अधिका:यांकडे देण्यात आला.
हॉस्पिटल जप्तीसाठी आलेल्या पथकाच्या अंगावर सोडले श्वान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 12:29 IST