शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 16:36 IST

सायगाव येथे डॉ.तुषार ठाणसिंग अहिरे (वय ४०) यांनी शुक्रवारी सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आत्महत्या केली.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अज्ञातआत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठीजबाबदार कोणालाही धरू नयेबँकेचे पैसे कुटुंबियांना देण्यात यावे

सायगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथे डॉ.तुषार ठाणसिंग अहिरे (वय ४०) यांनी शुक्रवारी सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आत्महत्या केली.राहत्या घरात सरीला दोर बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. त्यांच्या पायाखाली स्टीलचा मोठा डबा होता. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये बडोदा बँकेत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर पैसे असून, ते पैसे पत्नी, मुली, आई-वडील, भाऊ तसेच बहिणीचा मुलगा व मुलींच्या लग्नासाठी १०-१० हजार रुपये माझ्या नावाने देण्यात यावेत. मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे. या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीत लिहून ती पलंगावर ठेवली होती. डॉ.तुषार अहिरे मूळचे अस्ताने, ता.मालेगाव येथील रहिवाशी आहेत. ते सायगाव येथे गेल्या सात-आठ वर्षांपासून वास्तव्यास होते. ते सायगाव येथून मळगाव व गिरणा डॅम येथे व्हिजीटला जात होते. ही घटना घडली तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याजवळ नव्हत्या. त्या शिरपूर येथे माहेरी गेल्या होत्या व त्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्याजवळ राहत नव्हत्या, अशी माहिती समजली.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, एक बहीण, आई-वडील असा परिवार आहे. पंचनामा मेहुणबारे येथील पो.कॉ.गोरख चकोर यांनी केला. डॉ.तुषार अहिरे यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूChalisgaonचाळीसगाव