शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची जीवनशैली व ढासळते आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:24 IST

परवाच डॉ.नीलेश शिंपी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. खरे तर ...

परवाच डॉ.नीलेश शिंपी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. खरे तर आयुष्यभर आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या आणि आरोग्य विषयक सल्ला देणाºया डॉक्टरांचे आरोग्य उत्तम असायला हवे, पण तसे नाही. सामान्य जनतेपेक्षा डॉक्टरांचे सरासरी आयुष्यमान १० वर्षांनी कमी आहे. दिव्याखाली अंधार यावर गंभीर विचार करण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांना आहे. कामाचे अतिरिक्त तास, अवेळी खाणे, अवेळी झोपणे, व्यवसायातील ताणतणाव, कर्जाचे हप्ते ही तर मुख्य कारणे आहेतच. त्याबरोबर पैशांचा अतिहव्यास, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार आणि व्यसने हेसुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत. हल्ली डॉक्टर आणि रुग्ण यातील सुसंवाद बराच बिघडलेला आहे. त्यातून निर्माण होणार ताणतणाव दोघांना घातक आहे. चाळीस वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ व्यवसायात मला जे अनुभव आले त्यावरून माझ्या व्यवसाय बंधू-भगिनींना काही नम्र सूचना करू इच्छितो. आपला व्यवसाय याप्रमाणे नियंत्रित करा की रोजचे काम आठ तासांपेक्षा जास्त होणार नाही. या प्रक्रियेत पैसा कमी मिळेल, काही रुग्ण नाराज होतील, पण डॉक्टरांनी आपले आरोग्य चांगले ठेवले तरच त्यांना पेशंटचे आरोग्य चांगले ठेवता येईल. ठरलेल्या तपासणीच्या वेळेव्यतिरिक्त कोणी आल्यास इर्मजन्सी सर्व्हीस आपल्याला द्याव्याच लागतात. पण सवडीप्रमाणे लोक येतात आणि आपली शिस्त बिघडवितात. त्यांना थोडी शिस्त लावा. चोवीस तास सेवा एकट्या डॉक्टरांना देणे शक्य नाही. एखाद्या आयसीयुशी टाय-अप करा. आयसीयुमध्ये जाणाºया सर्व पेशंटना अ‍ॅडमिट करायची गरज नसते. त्याठिकाणी ओपीडी तपासणी आणि उपचार उपलब्ध असतात. आपल्याकडे असलेली उपकरणे आणि आपले ज्ञान यांच्या सीमा ओळखा. ज्यांना आपण योग्य सेवा देऊ शकत नाही त्यांना हायर मेडिकल सेंटरमध्ये पाठवा. सिरीयस पेशंट आपल्याकडे अ‍ॅडमिट करून स्वत:चा ताणतणाव वाढवू नका. रोज सात ते आठ तास शांत झोपा. रोज किमान एक तास व्यायाम करा. तेल, तूप, साखर, मांसाहार शक्यतोवर कमी सेवन करा, वजन नियंत्रित ठेवा. व्यसंनापासून दूर रहा. आपला परिवार, मित्र मंडळी, संगीत, आवड योग्य वेळ द्या. सामाजिक कार्यक्रमात भाग घ्या. दर सहा महिन्यांनी परिवार आणि मित्र मंडळीसोबत टूर काढा, योग्य आहार, विहार, विचार करून आपले आयुष्य सुंदर करू या.- डॉ.विश्वेश अग्रवाल, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव