शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात अडकलेली डबी डॉक्टरांनी अलगद काढून बालकाला दिले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 15:12 IST

मुक्ताईनगर , जि.जळगाव : १० महिने वयाच्या विराटच्या गळ्यात वेदनाशामक मलम (बाम) प्लॅस्टिक डबी अडकल्याने श्वसन नलिका दाबली जाऊन ...

ठळक मुद्देमुक्ताईनगरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.एन.जी.मराठे यांची तत्परताथोडा वेळही उशीर झाला असता तर बालकाचा जीव गेला असता

मुक्ताईनगर, जि.जळगाव : १० महिने वयाच्या विराटच्या गळ्यात वेदनाशामक मलम (बाम) प्लॅस्टिक डबी अडकल्याने श्वसन नलिका दाबली जाऊन अत्यवस्थ झालेल्या बालकाला शहरातील हृदयरोग व नाक, कान, घसातज्ज्ञ डॉ.एन.जी.मराठे यांनी जीवदान दिले.विराट बबन रायपुरे, रा.भांनगुरा, ता.मुक्ताईनगर या अवघ्या १० महिने वयाच्या बालकाने शनिवारी सकाळी साडेआठला अंथरूणावर खेळता खेळता जवळ पडलेली वेदनाशामक बामची प्लॅस्टिकची डबी तोंडात घातली आणि ती गळ्यात जाऊन अडकली.विराटच्या वयाच्या हिशोबाने अन्ननलिका बारीक आणि प्लॅस्टिकची डबी आकारात मोठी यामुळे डबी अन्ननलिकेच्या तोंडावर, तर श्वसन नलिकेच्या बाजूने जाऊन अडकली. बालकाच्या रडण्यामुळे डबी अधिक आत ओढली गेली आणि श्वसन नलिका दाबली जाऊन विराट अत्यवस्थ होऊ लागला. अशा परिस्थितीत त्याला डॉ.एन.जी.मराठे यांच्याकडे आणण्यात आले. श्वास कमी झाल्याने तो निळा पडू लागला. डॉक्टरांनी मोठ्या शिताफीने प्रसंगावधान राखत लहानग्या विराटच्या गळ्यातून प्लॅस्टिकची डबी काढली आणि विराटने मोकळा श्वास घेतला.थोडाही वेळ अधिक वाया गेला असता तर श्वास थांबून विराटने जीव गमावला असता. वेळेवर डॉक्टर देव म्हणून सापडले आणि डॉक्टरांच्या साक्षात देवरूपाने विराटला जीवदान मिळाले, अशी भावना या विराटच्या मातेने व्यक्त केली.भेदरलेल्या अवस्थेत असलेली त्याची आई आणि आजी सोबत मामाने विराटच्या गळ्यातून डबी काढली गेली आणि त्याने आवाज काढला. हे पाहून आनंदअश्रूंना वाट मोकळी करून दिली. डॉक्टरांचे साक्षात देव म्हणून त्यांनी आभार मानले. 

टॅग्स :docterडॉक्टरMuktainagarमुक्ताईनगर