शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या महिला डॉक्टरांचा एड्सग्रस्त मुलांच्या जीवनात ‘ प्रकाश ’ आणण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 10:17 IST

जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एड्सग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत.

ठळक मुद्देजळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एड्सग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत.आज जवळपास ७० एड्सग्रस्त मुलांना त्या महिन्याला सकस आहार पुरवित आहेत.

जळगाव - घरात सर्व काही असताना एका महिला डॉक्टरांना आगळा - वेगळा छंद जडला आहे. कवी विंदा करंदीकर यांच्या देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... आणि एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे... अशीच एक वेगळी सेवा त्या करीत आहेत.

जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एड्सग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत.

गेल्या काही वर्षापूर्वी त्या मुलींच्या रिमांड होममध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांनी मुलींची नेत्र आणि दंत तपासणीची केली. यातून मग मुलांच्या सेवेचा छंदच त्यांना लागला. एकदा मग जळगावातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांच्याशी त्यांची ओळख झाली. यातून मग एड्सग्रस्त मुलांसाठी काहीतरी करायला हवे, हा विचार पुढे आला. सुरुवातीला त्यांनी एका एड्सग्रस्त मुलाला दत्तक घेतले. मग हळू हळू ही संख्या वाढू लागली आणि आज जवळपास ७० एड्सग्रस्त मुलांना त्या महिन्याला सकस आहार पुरवित आहेत. कधी निधी जमा करुन तर कधी पदरमोड करुन.

जागतिक आरोग्य संघटनेने एड्सग्रस्त मुलांच्या आहारात काय असावे, याचे मागदर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्यानुसार हा आहार दिला जातो. विशेष म्हणजे डॉ. नीलीमा सेठीया यांच्या हाकेला जळगावातील अनेक दाते पुढे आले आहेत. ते दर महिन्याला न चुकता आहारासाठी निधी एकत्र करुन तो त्यांच्याकडे देत असतात. नीलीमा यांनी स्वत: एड्सग्रस्त ११ मुले दत्तक घेतली आहेत. त्यांच्यासह त्या आज जवळपास ७० मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

विशेष म्हणजे दात्यांना कुठलीही शंका नको म्हणून दर महिन्याला या मुलांचे वजन केले जाते आणि मगच त्यांना आहाराचे वाटप केले जाते. मराठे ता. चोपडा येथील आश्रमशाळेलाही डॉक्टरांनी मोठी मदत केली आहे. तीन वर्षापूर्वी त्या या आश्रमशाळेत गेल्या होत्या. त्यावेळी तिथे फक्त एक आठवडा पुरले एवढेच अन्नधान्य होते. डॉ. सेठीया यांना हे कळताच त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना याची माहिती दिली आणि अखंडपणे मदतीचा ओघ सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरJalgaonजळगावHIV-AIDSएड्स