लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील एका खासगी हॉस्पिटलमधून डॉ.कुणाल जनार्दन नारखेडे (वय ३८, रा. भूषण कॉलनी ) मंगळवारी सकाळी ११.३० वाजता बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी पत्नी डॉ.जागृती नारखेडे यांच्या खबरीवरुन रात्री दहा वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
डॉ.कुणाल नारखेडे हे आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ते हॉस्पिटल येथे कामावर गेले होते. २० मिनिटात परत येतो असे सांगून साडेअकरा वाजता बाहेर गेले. जाताना त्यांनी मोबाईल हाॅस्पिटलमध्येच ठेवला. दुपारी दीड वाजता डॉ. नारखेडे यांची पत्नी डॉ.जागृती नारखेडे यांनी पती डॉ. कुणाल नारखेडे यांच्याशी बोलण्यासाठी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, ते मोबाईल दवाखान्यातच ठेवून बाहेर गेल्याचे समजले. दिवसभर शोध घेतला; मात्र काहीच माहिती मिळाली नाही. तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
नारायण आटोळे
जळगाव- शहरातील जुना खेडी रोड परिसरातील गीताई नगरातील रहिवासी नारायण चिंतामण आटाेळे (वय-७८) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.