शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पहूर रुग्णालयाला डॉक्टर देता का, डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:57 IST

तब्बल दीड महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाला रुग्णालयासाठी डॉक्टर मिळत नसल्याने ‘कोणी डॉक्टर देता का, डॉक्टर’ असे म्हणण्याची वेळ पहूरकरांवर येऊन ठेपली आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांअभावी दीड महिना उलटूनही रुग्णसेवा ठप्पचनागरिकांच्या संतप्त भावनाप्रशासनावर रुग्ण नाराज

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. मात्र पहूर ग्रामीण रुग्णालय याला अपवाद ठरले आहे. तब्बल दीड महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाला रुग्णालयासाठी डॉक्टर मिळत नसल्याने ‘कोणी डॉक्टर देता का, डॉक्टर’ असे म्हणण्याची वेळ पहूरकरांवर येऊन ठेपली आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.पहूर ग्रामीण रूग्णालय राष्ट्रीय महामार्गावर आहे. दररोज शंभर ते दोनशे रुग्णांना रुग्णसेवा याठिकाणी मिळत आली आहे. मात्र २० आॅक्टोबरपासून तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी कारणावरून राजीनामा दिला आहे. या रिक्त जागांवर आरोग्य प्रशासनाला तब्बल दीड महिन्यांपासून डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे रुग्णसेवा ठप्प आहे. नागरिकांना आरोग्य सेवा देणे शासनाला बंधनकारक आहे, असे दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेच्या पाहणी दरम्यान सांगितले. पण शासनाला दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरीही वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे पहूर रुग्णालयाच्या रूग्णसेवेवरून समोर आले आहे. याविषयी पहूरकर जनतेला आरोग्याच्या मूलभूत हक्कासाठी एकदिवस रस्त्यावर उतरून जनतेच्या तीव्र रोषाला प्रशासनाला सामोरे जाण्याची वाट पाहात आहेत का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJamnerजामनेर