शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा बँकेच्या 10 शाखा बंद करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 12:06 IST

जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत मागणी

ठळक मुद्देवसंत साखर कारखाना सुरू करण्याबाबत विचाराधीनराज्य बँकेकडे एक हजार कोटींची मागणी

पीक कर्जासाठी हजार कोटींचा प्रस्ताव पाठविणारऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21- जिल्हा बँकेच्या तोटय़ात असलेल्या 10 शाखा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी शनिवारी दुपारी झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांनी केली. दरम्यान,आगामी खरीप हंगामाच्या पीक कर्जासाठी 1 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडे पाठविण्यात येणार असल्याचे अध्यक्षा  रोहिणी खडसे - खेवलकर यांनी सांगितले. 

शेतकरी हितासाठी शाखा सुरू ठेवाजिल्हा बँकेच्या 10 शाखा तोटय़ात असल्याने त्या बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. मात्र या शाखा बंद केल्याने अनेक गावांमधील शेतक:यांची गैरसोय होईल. त्यामुळे त्या बंद करू नये, अशी मागणी बँकेचे संचालक चिमणराव पाटील यांनी  केली. या बाबत सकारात्मक विचार घेण्यात येईल, असे अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितल्याचे चिमणराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नोकर भरती लवकरात लवकर कराजिल्हा बँकेत नोकर भरतीला मंजुरी मिळालेली आहे. सध्या अनेक ठिकाणी कर्मचारी कमी असल्याने कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे ही नोकर भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी संचालकांची आहे. मात्र या बाबत कोणताही  निर्णय झाला नाही. बैठकीनंतर अध्यक्षा रोहिणी खडसे यांना पत्रकारांनी  विचारले असता, ठोस उत्तर मिळाले नाही. मात्र व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी अहमदनगर जिल्हा बँकेतील स्थितीचा उल्लेख करीत  सावधानता बाळगली जात असल्याचे सांगितले.

राज्य बँकेकडे एक हजार कोटींची मागणीआगामी हंगामासाठी पीक कर्जासाठी राज्य बँकेकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. 

87 हजार शेतक-यांना 434 कोटींची कजर्माफी शेतकरी कजर्माफी योजनेंतर्गत जिल्ह्यात 87 हजार शेतक:यांना 434 कोटींची कजर्माफी देण्यात आली असून शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत 45 शेतक:यांना 119 कोटींचे अनुदान देण्यात आले. 

वसंत साखर कारखाना सुरू करण्याबाबत विचाराधीनवसंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्याबाबत स्थानिकांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. 

एकनाथराव खडसे यांची अनुपस्थितीजिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीस माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे संचालक एकनाथराव खडसे हे आजच्या बैठकीस हजर नव्हते.