शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी होणार ‘नमकीन’, डाळींच्या भावात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:22 IST

भाव सहा महिन्यांच्या निच्चांकीवर

ठळक मुद्देतेलातही वाढ नाहीबेसनपीठाचेही भाव घसरलेआवक वाढली

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 -  आवकच्या तुलनेत मागणी नसल्याने  डाळींचे भाव गडगडल्याने ग्राहकांना दिलासा मिळला असून दिवाळीचा गोडवा वाढणार  आहे. एरव्ही दिवाळीमध्ये हरभ:याच्या डाळीसह बेसनपीठाला मागणी वाढून भावही कडाडतात.  मात्र यंदा उलट चित्र असून सणासुदीत भाव कमी झाले आहे. 

आवक वाढलीप्रत्येक डाळ, कडधान्याचा विचार केला तर सर्वाची आवक वाढली आहे. महाराष्ट्रात उडीद-मुगाचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न व आवक नसले तरी इतर राज्यातून मुगाची चांगली आवक होत आहे. दुसरीकडे मात्र पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्याने डाळींचे भाव कमी होत आहे. उडीदाच्या बाबतीतही असेच चित्र असून मध्यप्रदेशात उडीदाचे चांगले उत्पादन आल्याने तेथून येणा:या मालाला 4000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. 

दिवाळीत ज्या डाळीला सर्वात जास्त मागणी असते त्या हरभरा डाळीतही असेच चित्र आहे. दिवाळीमध्ये लाडू, बर्फी व इतर पदार्थ तयार करण्यासाठी हरभरा डाळ, बेसनपीठ यांना जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांचे भाव या दिवसात वाढतात. मात्र यंदा आवकच जास्त असल्याने भाव वाढण्यापेक्षा उलटकमी झाले आहे. 

बेसनपीठाचेही भाव घसरलेबेसनपीठाचे भाव यंदा तर शंभरीच्या आत आले आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलो असणारे भाव यंदा 80 ते 90 रुपये प्रति किलोवर आले आहे. 

तेलातही वाढ नाहीदिवाळीमध्ये खाद्य तेलाचेदेखील भाव वाढतात. मात्र यंदा तेलाचे भावदेखील स्थिर आहे. सोयाबीन तेल 72 ते 78 रुपये प्रति किलो तर शेंगदाणा तेल 115 ते 130 रुपये प्रति किलो (दर्जा व कंपनीन्यांनुसार यापेक्षा जास्त दर) आहे. 

डाळींसह बेसनपीठाचे भाव कमी होणे व तेलाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांची दिवाळी गोड होणार आहे.  सध्या फराळाचे विविध पदार्थ करण्यास जोमाने सुरुवात झाली आहे. 

डाळींचे भाव गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे व्यापा:यांनी सांगितले. सध्या तूर डाळीचे भाव 55 ते 60 रुपये प्रति किलो, हरभरा डाळ - 62 ते 70, मूग डाळ - 60 ते 64, उडीद डाळ 60 ते 64 रुपये प्रति किलो आहे. गेल्या महिन्यात हेच भाव 10 ते 20 रुपयांनी जास्त होते. 

दरवर्षी दिवाळीमध्ये डाळींची मागणी वाढते, मात्र यंदा आवक वाढली असली तरी मागणी पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे भावदेखीलघसरलेआहे. - प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल असोसिएशन. 

महाराष्ट्रात कडधान्याचे उत्पादन कमी असले तरी इतर राज्यातून माल येत असल्याने आवक वाढून डाळींचे भाव कमी झाले आहे. दिवाळीमध्ये असणारी मागणी पाहिजे तेवढी नाही. - प्रविण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणार्मचट असोसिएशन.