शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड तालुक्यातील येवती येथे सोमवारी साजरी होणार करदोडा दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 14:56 IST

जामठी, ता.बोदवड : तालुक्यातील येवती येथील अंबत्रुषी महाराज यांची करदोडा दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.

ठळक मुद्देअंबत्रुषी महाराजांची करदोडा दिवाळीची १०५ वर्षांपासून अखंड परंपराअंबत्रुषी महाराजांनी असाध्य रोगांपासून मुक्त केल्याची भावनाऐन दिवाळीच्या दिवशी अंबत्रुषी महाराजांचे निधन झाल्याने दिवाळीनंतरच्या पहिल्या सोमवारी साजरी करतात करदोडा दिवाळी

जितेंद्र पारधीजामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील येवती येथील अंबत्रुषी महाराज यांची करदोडा दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.येथील अंबत्रुषी महाराज यांची १०५ वर्षांपासून अखंड परंपरा सुरू आहे. गावानजिक असलेल्या जगदेव माळी यांच्या शेतातील अंबत्रुषी महाराज यांचे भव्य असे मंदिर आहे. या मंदिरात गावातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या मंदिरातील अंबत्रुषी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या मूर्तीस महिलांकडून अंबत्रुषी महाराज यांच्या मूर्तीस करदोडा बांधण्यात येतो. नंतर सामूहिक आरतीचे गायन करण्यात येते व नैवेद्य अर्पण करण्यात. नंतर मंदिर परिसरात व गावात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येते.करदोडा दिवाळीची आख्यायिका-तालुक्यातील येवती येथील अंबत्रुषी महाराज यांची करदोडा दिवाळीची १०५ वर्षांपासून अखंड परंपरा सुरू आहे. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी गावातील लोकांना त्वचेच्या असाध्य रोगांनी ग्रासले होते व गावातील अनेक लोक अत्यंत जरजर झाले होते. गावानजिक असलेल्या एका शेतामधे अंबत्रुषी नामक महाराजांचे एका झोपडीत वास्तव्य होते. त्यांनी गावातील लोकांना झालेल्या असाध्य रोगांचे निराकरण करून या रोगातून मुक्त केले. महाराजांच्या दैवी शक्तीमुळेच आमची मुक्तता झाली, त्यामुळे गावातील लोक महाराजांची सेवा करू लागले. मात्र काही वर्षांनंतर अंबत्रुषी महाराज यांचे ऐन दिवाळीच्या दिवशी निधन झाल्याने येवती व रेवती या गावातील नागरिक आजपर्यंत दिवाळी हा सण साजरा करत नाही, अशी आख्यायिका जुणे-जाणकार सांगतात. दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी करदोडा दिवाळी हा सण साजरा करतात. 

टॅग्स :SocialसामाजिकBodwadबोदवड