शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची ‘दिवाळी’ तर व्यापाऱ्याचे ‘दिवाळे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 19:25 IST

बोदवड येथे आडत दुकान फोडून लाख रुपये किमतीच्या २२ क्विंटल कापसाची चोरी

बोदवड :   चोरीच्या घटनांनी आता पुन्हा तोंड वर काढण्यास सुरुवात केली असून चार दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना चोरट्यांनी लाख रुपयांची कापूस चोरी करून जणू सलामीच दिली आहे.शहरातील जामनेर रस्त्यावर हायस्कूलसमोर असलेल्या अनिल गुलाबचंद अग्रवाल यांचे आडत दुकान असून या दुकानात जवळपास पन्नास क्विंटल कापूस खरेदी करून भरून ठेवलेला होता. १३रोजी नेहमी प्रमाणे दुकानदार रात्री सात वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले व १४ रोजीसकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, दुकानच्या शटरचे कुलूप तोडलेले व दुकान अर्धे उघडे आढळले. याबाबत त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता दुकानात आदल्या दिवशी पूर्ण भरलेला कापूस अर्धा खाली झालेला दिसून आला तर दुकानमधील गल्ला तसेच आतील हिशेबच्या वह्याही फेकलेल्या आढळून आल्या. याबाबत त्यांनी बोदवड पोलिसात धाव घेत घटना कथन केली.यात त्यांच्या दुकानातील २३ क्विंटल कापूस चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले, असून आजच्या बाजार भावप्रमाणे एक लाख रुपयांचा कापूस चोरीस गेला. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता दुकानाचे वरून पत्रेे तोडून दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सारंगी तलाववरून चोरट्यानी कब्रस्तानमध्ये वाहन         उभे करून कापूस गोण्यांमध्ये भरून     वाहून नेल्याचे ठिकठिकाणी पडलेल्या कापसाच्या बोंडावरून दिसून आले, सदरच्या प्रकारने चोरट्यांची दिवाळी तर झाली, मात्र व्यापाऱ्याचे दिवाळे निघाल्याचे  दिसून आले. याबाबत बोदवड पोलीस स्टेशनला व्यापारी अनिल गुलाबाचंद अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३८०,४५७,प्रमाणे घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.