शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आतषबाजीसह दीपावलीचा झगमगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 22:10 IST

विविध प्रतिष्ठानांसह घरोघरी लक्ष्मीपूजन झाले मोठ्या उत्साहात

भुसावळ : लक्ष्मीपूजनानिमित्त  सर्वत्र मोठ्या उत्साहात  लक्ष्मी पूजन करण्यात आले. व्यापारी बांधवांनी  खतावण्यांचे पूजन करून हिशेबाच्या नवीन वर्षाच्या कामकाजाचा शुभारंभ केला. फटाक्यांची आतशबाजीही जोरदार झाली.यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असले तरी बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून रोजच गर्दी दिसून येत आहे.  शनिवारी लक्ष्मीची मूर्ती व फोटो, पूजेचे साहित्य  तसेच फूल व हार घेण्यासाठी सकाळपासून ते दुपारपर्यंत खूपच गर्दी दिसून आली. संध्याकाळी केरसुणीचे पूजनही लक्ष्मी पूजनासोबत झाले.  व्यापारी बांधवांनी दुकान व घरी अशा वेगवेगळ्या पूजा केल्या. यानिमित्त अनेक दुकानांसमोर तसेच घरांसमोर रांगोळी काढून दीप प्रज्वालित करण्यात आले. लक्ष्मी पूजनानंतर काही व्यापारी बांधवांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फटाक्यांची आतशबाजी केली. शहरातील दाणाबाजारातील प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानमध्ये लक्ष्मी पूजन करण्यात आले.  व्यापारी बांधवांसोबत श्रीमंत, मध्यमवर्गीय  तसेच गोरगरिबांनी आपापल्या परिने पूजनाचा कार्यक्रम केला.  प्रत्येक घरात कुटुंबातील सदस्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी साळीच्या लाह्या, बत्ताशे, धने व गूळ व मिठाईचा नैवेद्य दाखविण्यात आला.  सर्वत्र पणत्या, रोशणाई आणि कंदिलाचा लखलखाट दिसून आला. फटाक्यांची आतषबाजीलक्ष्मी पूजनानंतर कोरोनाला न जुमानता  रात्री सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली.  फुलझडी, चक्री, आकाशात झेपावणाऱ्या उंच फटाक्यांमुळे आसमंत उजळून निघाला होता. कोरोनाचे सावट असले तरी दिवाळीचा उत्साहापुढे हे सावट फिकेच पडले होते. दरम्यान दिवाळीमुळ्य गेल्या    काही दिवसांमध्ये बाजरपेठेत तेजी निर्माण झाल्याने  व्यापारीही खुष आहेत.