ऑनलाइन लोकमतकळमडू, जि. जळगाव, दि. 16 - सध्याच्या धावपळीच्या काळात कोणी कोणासाठी वेळ देत नाही, मात्र आपल्या शाळेसाठी सुट्टीच्या दिवसातही काही तरी करावे या उद्देशाने भर उन्हाळ्यात दिव्यांग शिक्षक भटू लक्ष्मण कोठावदे हे झाडांना पाणी देऊन ते जगवण्याचा प्रय} करत आहेत.दोन वषार्पूर्वी जि.प. मुलांच्या शाळेच्या प्रांगणाला लोकवर्गणी व शिक्षकांच्या सहकार्यातून तारेचे कुंपन करण्यात आले तर गेल्या वर्षी पावसाळ्यात सुशोभिकरणासाठी विविध प्रकारचे 50 ते 60 झाडे लावण्यात आली. पावसाळा व हिवाळ्यात शाळा सुरू असताना सर्व शिक्षकांनी झाडांची निगा राखली. मात्र ऐन उन्हाळ्यात शाळेच्या सुटीच्या काळात या झाडांना पाणी मिळत नसल्याने झाडे कोमजू लागली होती.ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना शिक्षक भटू कोठावदे व उत्तम महाजन यांनी टँकरद्वारे पाणी आणून शाळेत पाण्याचा साठा उपलब्ध करून घेतला. दर दोन ते तीन दिवसाआड भटू लक्ष्मण कोठावदे हे स्वत: प्रत्येक झाडाला बादलीने पाणी टाकून जगवण्याचा प्रय} करत आहेत तर उत्तम महाजन हे शिक्षकही सुटीच्या दिवसात चाळीसगावहून कळमडूला येऊन झाडे जगवण्याची काळजी घेत आहेत. झाडांना पाणी टाकण्यासाठी दिव्यांग शिक्षक भटू कोठावदे यांना चिंधा भगतराव पाटील व बापू चिंधा सोनवणे यांचे सहकार्य मिळत आहे.
झाडे वाचविण्यासाठी दिव्यांग शिक्षकाची धडपड
By admin | Updated: May 16, 2017 18:48 IST