शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचे बनावट बियाणे विक्रीस आणणाऱ्या शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्षाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 20:56 IST

चोपडा : गुणवत्ता नियंत्रण विभागाची धडक कारवाई.

संजय सोनवणे, चोपडा जळगाव : चोपड्यात स्वदेशी - ५ कापूस बनावट बियाणांची ९५ पाकिटे आढळून आली. ही बियाणे हे रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (३५, रा. वर्डी, ता. चोपडा) याने विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या बियाणांची बाजारात किंमत जवळपास एक लाख रुपये आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

चोपडा-धरणगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट बियाणे असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाली होती. शहर पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये तपासणी केली असता संदीप पाटील हा त्याचे वाहन नादुरुस्त झाले म्हणून दोन प्लास्टिकच्या पिशव्या ठेवून गेल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर अमोल राजपूत यांनी दिली. त्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात अंकुर सिड्स कंपनीचे स्वदेशी- ५ संकर देशी कापूस बियाणे असलेली ९९ हजार ७५० रु. किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली.

तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत संदीप पाटील यांच्याविरोधात शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सायंकाळी त्याला वर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. बोगस बियाणांच्या रॅकेटमध्ये आणखी कोण आहेत, याचा शोध घेण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सपोनि संतोष चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी