जळगाव - सोमवार, 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विभागीय महसुल आयुक्त कार्यालय, नाशिक येथे विभागीय लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सद्यःस्थितीत कोविड बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या कार्यक्रमास कोणत्याही विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, आपले विभागाशी संबधीत अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत कार्यवाही करणेसाठी पाठविण्यात येईल, असे गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
विभागीय लोकशाही दिनाचे 8 मार्च रोजी आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 21:14 IST