भुसावळ : प्रहार जनशक्ती पक्ष संलग्नित प्रहार शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय संघटनेची नुकतीच जळगाव जिल्हा महिला आघाडी गठित करण्यात आली. यात जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी भुसावळ येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांची, तर उपप्रमुखपदी माया चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याध्यक्ष विकास घुगे, सरचिटणीस कृष्णा बोदेले व उपाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांच्या स्वाक्षरीचे तसे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
प्रहार संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीत सरचिटणीस अनुराधा दिलीपकुमार टाक, खजिनदार वंदना लीलाधर झांबरे, जिल्हा संघटक स्मिता आकाश माहुरकर, प्रसिद्धी प्रमुखपदी कामिनी शशिकांत नेवे, उपाध्यक्षा भाग्यश्री किशोर नेवे यांचाही समावेश आहे. एक वर्षासाठी या नियुक्त्या असतील.
प्रहारचे संस्थापक व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.