चोपडा येथील विज्ञान प्रयोगांची जिल्हास्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 08:08 PM2019-07-27T20:08:53+5:302019-07-27T20:09:23+5:30

चोपडा : राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर, नागपूरतर्फे आयोजित विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ...

 District-wise selection of science experiments at Chopda | चोपडा येथील विज्ञान प्रयोगांची जिल्हास्तरावर निवड

चोपडा येथील विज्ञान प्रयोगांची जिल्हास्तरावर निवड

Next

चोपडा : राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर, नागपूरतर्फे आयोजित विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला. यामध्ये शहरातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत जिल्हास्तरावर मजल मारली आहे.
विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, अंधश्रद्धा दूर व्हावी या उद्देशाने विज्ञान मेळाव्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. यानिमित्त रासायनिक घटकांची आवर्तसारणी व त्याचा मानवी कल्याणावर होणारा परिणाम या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले यांच्या हस्ते झाले. निमगव्हाण केंद्रप्रमुख युवराज पाटील तसेच चहार्डी केंद्राचे प्रमुख नरेंद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील १७ माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला. यात येथील क्लारा इंग्लिश मेडिअम स्कूलच्या आयुष किरण महाजन याने प्रथम, तर पंकज माध्यमिक विद्यालयाचा कैवल्य अनिल पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोघांची जिल्हास्तरावर निवड झाली असून, त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.
पंकज माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक विजया पाटील, पी.सी.पाटील, डी.जे.बाविस्कर, व्ही.बी.पाटील, डी.आर. सोनवणे, एस.पी.कुलकर्णी, ए.आर.सैंदाने, एम.पी.पाटील, जे.एस.महाजन, डी.बी.पाटील, विजय पाटील, सचिन बारेला, यज्ञेश अत्तरदे आदींनी परिश्रम घेतले. विज्ञान परिसंवादचे परीक्षण ए.डी.महाजन, एस.पी.पाटील, डॉ.बी.एम.सपकाळ यांनी केले. परिक्षकांचे आभार मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील यांनी मानले.सूत्रसंचालन पी.सी.पाटील यांनी केले.

Web Title:  District-wise selection of science experiments at Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.