जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ४९.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आतापर्यंत जून महिन्याच्या सरासरीच्या ४०.७ टक्के इतका पाऊस पडला आहे.
कृषी आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार, जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलीमीटर इतके आहे. गुरुवारपर्यंत पडलेला पाऊस हा जून महिन्याच्या सरासरीत ४० टक्के इतका आहे. असे असले तरी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जून महिन्यातील सरासरीच्या पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
तालुका किती झाला पाऊस टक्केवारी
जळगाव - ५१.९ मिमी - ३८.२ टक्के
भुसावळ ४९ मिमी ४०.५ टक्के
यावल ४९.५ मिमी ३८.९ टक्के
रावेर ३८.१ मिमी ३०.४ टक्के
मुक्ताईनगर ३७.१ मिमी ३७.२ टक्के
अमळनेर ११.२ मिमी ९.८ टक्के
चोपडा १९.६ मिमी १५.४ टक्के
एरंडोल ४४.१ मिमी ३६.५ टक्के
पारोळा ८६.४ मिमि ७०.३ टक्के
चाळीसगाव १०५.२ मिमी ८१.५ टक्के
जामनेर ६६.९ मिमी ४८.५ टक्के
पाचोरा ५० मिमी ४३.२ टक्के
भडगाव ४७.६ मिमी ३७.३ टक्के
धरणगाव ५६.९ मिमी ४०.६ टक्के
बोदवड २४.२ मिमी १९.५ टक्के