शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथील तलाठी मारहाण प्रकरणाशी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा संबध, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 12:26 IST

महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला अवैध वाळू आणणे योग्य आहे का?

ठळक मुद्दे मारहाण करणा-यांना अटक करण्याची मागणी महसूल मंत्र्यांच्या कार्यक्रमाला अवैध वाळू आणणे योग्य आहे का

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21- अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे  येथील तलाठी योगेश पाटील यांच्यावर 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या मारहाणीशी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा थेट संबंध असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. या प्रकरणातील मारहाण करणा-यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या बाबत शनिवारी दुपारी जिल्हा बँकेत पत्रकारांशी बोलताना अनिल भाईदास पाटील यांनी या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी ते म्हणाले की, 18 जानेवारी रोजी अमळनेर येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार होता.   प्रांताधिकारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ हे कार्यक्रमस्थळी पाहणी करीत होते. त्या वेळी वाळू वाहतूक करणा:या ट्रॅक्टरवर तलाठय़ांनी कारवाई करून तहसील कार्यालयात नेत होते. मात्र त्यावेळी 20 ते 25 जणांनी त्यास विरोध करून ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेले. त्या वेळी तलाठय़ांनी विरोध केला असता 20 ते 25 जणांनी उदय वाघ यांना या बाबत कळविले. त्याबाबत काय सूचना मिळाल्या माहित नाही, मात्र त्यानंतर तलाठय़ांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात भाजपाचे अमळनेर शहराध्यक्ष शीतल देशमुख व इतर 20 ते 25 भाजपाच्या कार्यकत्र्याचा समावेश असून मारहाण करणा-यांना अटक करावी. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा थेट संबंध असल्याचाही आरोप अनिल भाईदास पाटील यांनी करीत महसूल मंत्र्यांच्या कार्यक्रमाला अवैध वाळू आणणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला.

या प्रकरणाच्या फेर चौकशीची मागणी आपण पालकमंत्र्यांकडे केली असून अनिल भाईदास पाटील यांच्या आरोपात तथ्य नाही. अमळनेर तालुक्यातील हे तलाठी राष्ट्रवादीचेच असून त्यांच्याशी हातमिळवणी करून असे खोटे प्रकार केले जातात. दोन-तीन महिन्यांपूर्वीदेखील भूषण महाजन हे   घराच्या कामासाठी वाळू नेत असताना त्यांनी राष्ट्रवादीला मतदान केले नाही, म्हणून तलाठय़ांना हाताशी धरून त्यांच्यावर खोटा  गुन्हा दाखल करण्यात आला होता.  - उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा.