शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखाच्या बेनामी ठेवी प्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेच्या कक्ष अधिकाऱ्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:13 IST

एसीबीने केला गुन्हा दाखल

जळगाव : ग.स.सोसायटीत विभागीय अधिकारी किरण भिमराव पाटील यांच्या नावाने ठेवलेल्या बेनामी ५० लाख रुपयांच्या संपत्तीप्रकरणी संस्थेचे तत्कालीन चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी सुनील अभिमन सूर्यवंशी व किरण पाटील या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन सूर्यवंशी व पाटील या दोघांविरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम १३ (१) (१) सह १२ व भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील सूर्यवंशी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष असताना १४ जुलै २०१२ ते ते १ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत सोसायटीतील सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांचा मुलगा तथा संस्थेचे विभागीय अधिकारी किरण भिमराव पाटील यांच्याशी संगनमत करुन त्यांच्या नावाने सोसायटीची शाखा क्र.१ बळीराम पेठे येथे बनावट खाते उघडले होते. नंतर १२ फेब्रुवारी २०१६ रोजी नाममात्र बचत ठेव पावतीवर बनावट दस्ताऐवज तयार करुन सही करुन अष्टचक्र ठेव योजनेत ५० लाखाचा बेनामी गुंतवणूक केली. त्यानंतर १९ सप्टेबर २०१६ या नाममात्र ठेव पावतीवर बनावट सही करुन व्याजासह ५१ लाख ७८ हजार ८८७ रुपये काढून घेतले होते. या कामात किरण पाटील यांनी सूर्यवंशी यांना सहाय्य केले.खंडपीठाने दिले होते आदेशया बेनामी ठेव प्रकरणी रावसाहेब मांगो पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर १० जून रोजी सुनावणी झाली असता या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करुन चौकशी करुन संबंधित व्यक्तींविरुध्द कारवाई करून त्याचा अहवाल खंडपीठात सादर करण्याचे आदेश न्या.टी.व्ही.नलावडे व न्या.के.के.सोनवणे यांनी दिले होते. या आदेशाची प्रत प्राप्त होताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून सुनील सूर्यवंशी व किरण पाटील यांच्याविरुध्द फिर्याद दिली. या गुन्ह्याच तपासही ठाकूरच करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव