शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालय पुन्हा गोदावरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:58 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे पुन्हा आदेश : कोविड रुग्णासाठी ४०० बेड आरक्षित

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालय शाहू महाराज रुग्णालयात स्थलांतरीत केल्याच्या दोनच दिवसात पुन्हा हे रुग्णालय पुन्हा गोदावरी फांऊडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सुरु करण्याचे सुधारीत आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. हे रुग्णालय आधी कोविडसाठी अधिग्रहीत असून तेथे ४०० बेड वगळता इतर बेड सामान्य रुग्णांसाठी असतील. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या रुग्णालयात ४०० बेड कोराना रुग्णांसाठी आरक्षित असून त्यातील २८ अतिदक्षता विभागात तर १५० आॅक्सिजन तर इतर अत्यावश्यक बाब म्हणून अधिग्रहीत असतील. हे ४०० बेड वगळता इतर बेड अत्यावश्यक सेवा, जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व सुविधा रुग्णांना मिळतील.दरम्यान, आजपासून सामान्य रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या सुविधा व उपचार या रुग्णालयात मिळणार आहेत.रुग्ण सेवेसाठी हॉस्पिटल नेहमीच तयारआमच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णांवर येथे विविध योजनांमध्ये व मोफत उपचार केले जातात. शेजारील बुलढाणा, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार तसेच मध्यप्रदेशातील बºहाणपूर, खंडवा या भागातून देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारांसाठी येतात. लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यास नकार मिळाल्यानंतर आमच्याकडे उपचार करण्यात आले. सर्वसामान्यांची सेवा देण्यासाठी रुग्णालय बांधिल आहे.- डॉ उल्हास पाटील,अध्यक्ष, गोदावरी फांऊडेशनगोंधळाच्या स्थितीबाबत ‘लोकमत’ ने वेधले लक्षसर्वसामान्य रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याचेही आदेश प्रशासनाने काढले होते, मात्र डॉ. पाटील हॉस्पिटल कोरोनासाठी अधिग्रहण करण्यात आल्याच्या आदेशानंतर सर्वसामान्य रुग्णांनी कुठे जावे, असा प्रश्न ‘लोकमत’ ने वृत्तातून उपस्थित केला होता. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी पुन्हा सुधारीत आदेश काढून ४०० बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव