शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोक न्यायालयात ६० हजार प्रकरणांचा जिल्ह्यात निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:15 IST

लोकन्यायालयाच्या माध्यमातून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ६० हजार ८१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.  पक्षकारांना १७३ कोटी ८५ लाख ७३ हजार २६४ रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत  विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

सुनील पाटील । जळगाव : लोकन्यायालयाच्या माध्यमातून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ६० हजार ८१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.  पक्षकारांना १७३ कोटी ८५ लाख ७३ हजार २६४ रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी ‘लोकमत’ ला दिली. दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात प्रथमच झालेल्या वैकल्पिक वाद निवारणात १९४ पैकी १८५ प्रकरणांमध्ये मध्यस्थी घडवून आणत तडजोड करण्यात आली. तडजोडीची ही रक्कम ५० कोटीच्यावर असून टप्याटप्याने शेतकºयांच्या बॅँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. लोक न्यायालयाच्या संदर्भात ठोंबरे यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला असता तो प्रश्नोत्त्तर स्वरुपात देत आहोत.लोक न्यायालय म्हणजे नेमके काय?दुरावलेले संबंध, प्रलंबित व दाखलपूर्व असलेली प्रकरणे सांमजस्याने मिटविण्याकरिता भरविण्यात येत असलेल्या दाव्यांच्या प्रकरणाला लोक अदालत म्हणतात. महाराष्टÑातील उच्च न्यायालय, सर्व जिल्हा, तालुका, कौटुंबिक न्यायालये व इतर न्यायाधीकरण येथे राष्टÑीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये हे लोक न्यायालय घेण्यात येते.कोणती प्रकरणे लोक न्यायालयात     ठेवता येतात?निगोशिएबल इन्स्टुमेंटस् अ‍ॅक्टच्या कलम १३८ खाली दाखल झालेली प्रकरणे ठेवता येतात. त्यात बॅँक वसुली, कामगार वाद, नोकरीबाबतचे प्रकरणे (त्यात पगार व इतर भत्यांचा समावेश आहे.) अपघात, महसूल, भूसंपादन, वीज व पाणी देयकाबाबत तसेच वैवाहिंक व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे. महसुलची जिल्हा व उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणेही ठेवता येतात.-लोक न्यायालयात प्रकरण आल्यानंतर पक्षकाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील करता येत नाही. खटल्यांमध्ये साक्षी, पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयात निकाली निघणाºया प्रकरणामंध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.लोक न्यायालय कधी घेण्यात येते?तालुका व जिल्हा पातळीवर दर महिन्याला लोक न्यायालय होते. त्यात न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत होते. शिवाय विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील पुरविण्यात येतो. आता १३ जुलै रोजी लोक न्यायालय होणार आहे. या लोक न्यायालयात प्रकरणे ठेवण्यासाठी पक्षकाराला आधी प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव