शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

जिल्हा बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी मार्ग काढणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:02 IST

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट मसाकाने दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्याचे खाते एनपीएमध्ये केल्याने कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँक व कारखाना यांनी समन्वय साधावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीतकार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्याचा परिमाण ऊस लागवडीवर४२ वर्षे सलगपणे गाळप करणारा एकमेव कारखाना ‘मसाका’

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट मसाकाने दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्याचे खाते एनपीएमध्ये केल्याने कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँक व कारखाना यांनी समन्वय साधावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.मधुकर सहकारी साखर कारखाना हा गेली ४२ वर्षे सलगपणे गाळप करणारा एकमेव कारखाना असून, कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. त्यांचा परिमाण ऊस लागवडीवर झाला. तसेच टनेजमध्येसुद्धा घट आलेली आहे.कारखान्याच्या गाळप हंगाम २०१८-१९ आर्थिक अडचणीमुळे एक महिना उशिरा सुरू झाला, त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी कोटा पद्धत सुरू केल्याने साखर साठा पडून आहे. साखरेस उठाव नसल्याने साखर विक्री मंदावलेली आहे. त्यामुळे बँक व्याजाचा बोझा वाढत आहे. मागील हंगामाची साखर तसेच चालू हंगामाची शिल्लक साखर यामुळे कर्ज उचलीची मर्यादा संपलेली आहे. सदर मर्यादा वाढवून मिळण्याबाबत बँकेस प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. याबाबत जिल्हा बँकेकडे सतत पाठपुरावा मधुकर कारखान्याने केला आहे.कर्ज उचल मर्यादा बँकेकडून अद्याप वाढवून न मिळाल्यामुळे १ फेब्रुवारीपासून पुरवठा झालेल्या उसाचे पेमेंट शेतकºयांना करखान्याकडून अद्याप करता आलेले नाही. कर्ज उचल मर्यादा वाढवून देण्यासाठी बँकेस अपुरा पुरावा, एन.पी.ए. नेटवार्थ इ. बाबींची तांत्रिक अडचण असल्याने तसेच त्यासाठी शासनाची थकहमी आवश्यक आहे. अशा बाबी चर्चेमध्ये कारखान्याच्या वतुर्ळात सुरू आहे मधुकर कारखान्याकडे बँकेची असलेली कर्ज यामध्ये प्रामुख्याने साखर मालतारणवरील कर्ज रु.५७ कोटी आहे. सदर कर्ज हे साखरेच्या ताबेगहाणावरील आहे. तसेच साखरेचे भाव घसरल्याने सदर साखर साठ्यावर रु. १९ कोटींचे शॉर्ट मार्जिन आहे. माल तारण कर्ज वगळता कारखान्याकडे इतर कर्ज रु. ७.५७ कोटी इतके आहे. तसेच कारखान्याच्या संपूर्ण मालमत्तेचे प्रथम अग्रहक्कांचे गहाणखत बँकेस करून दिलेले असल्याने कारखाना जास्तीच्या कर्जाची मागणी जिल्हा बँकेकडे करू शकतो. म्हणून बँकेने किमान ऊस पुरवठादार शेतकºयांचे ऊस पेमेंट करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर इतर देय रकमांबाबत निर्णय चचेर्अंती घेता येईल, अशी भूमिका कारखान्याने मांडली.बँकेस येणाºया तांत्रिक अडचणी व ऊस पेमेंटबाबतची वस्तुस्थिती याची सांगड घालून बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी यामधून योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे. सध्या शेतकरी दुष्काळामध्ये होरपडत आहे. त्यास येणाºया हंगामासाठी बी-बियाणे, खते, मशागत यासाठी पैशांची आवश्यकता आहे. यासाठी वेळेत शेतकºयांना पैसा न मिळाल्यास त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याचा गांभिर्याने विचार करावा, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFaizpurफैजपूर