शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘जिल्हा बंदी’ आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:06 IST

जळगाव : जगासह देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘जिल्हा बंदी’चे आदेश जारी ...

जळगाव : जगासह देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘जिल्हा बंदी’चे आदेश जारी करण्यात आले आहे़ त्यात फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे़दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यानुसार पोलीस अधिक्षक जळगाव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना संयुक्तरित्या जिल्हातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत़ अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही नागरिकास जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा बाहेरी जिल्ह्यतील नागरिकास जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे़आदेशातून यांना वगळले...‘जिल्हा बंदी’ आदेशातून शासकीय, निमशासकीय, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमन वाहने, अत्यावश्यक व जिवनावश्यक वस्तू, सेवा, मनुष्यबळ, पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था अर्थात पिण्याचे पाणी, दुध, फळे, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे, टेलीफोन व इंटरनेटची सेवा, हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारे साधन सामुग्री, प्रसार माध्यमांची वाहने, विद्युत विभागाशी संबंधित उपकरणे, पेट्रोल, गॅस, डिसेल आदींना या बंदी आदेशातून वगळण्यात आलेले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव