शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाकडून आता ३८ वाळू गटांचा नवीन धोरणानुसार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 19:11 IST

लिलाव घेऊनही अनेक घाट बंदच

ठळक मुद्देअवैध उपसा मात्र जोरातभर दिवसाही सुरू अवैध वाळू वाहतूकपोलीस, जिल्हा प्रशासनाचे दूर्लक्ष

जळगाव: जिल्ह्यातील लिलावाला प्रतिसाद न मिळालेल्या २८ वाळू गटांची तसेच नव्याने प्रस्तावित १० अशा ३८ वाळू गटांची लिलावाची प्रक्रिया आता शासनाने जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणानुसार होणार आहे. दरम्यान यापूर्वी लिलाव घेतलेल्या २१ वाळू गटांपैकी एकाला स्थगिती असली तरी उर्वरीत २० पैकी केवळ ९ वाळू गटच सर्व प्रक्रिया करून सुरू झाले आहेत. तर नदीपात्रामधून अवैध वाळूचा उपसा मात्र जोरात सुरू आहे. महसूल प्रशासन मात्र त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष करीत आहे.नवीन धोरणानुसार लिलावदोन टप्प्यात लिलाव प्रक्रिया होऊनही केवळ २१ वाळू गटांचा लिलाव झाला आहे. तर २८ वाळू गट प्रतिसाद न मिळाल्याने बाकी आहेत. मात्र आता नवीन वाळू धोरण लागू झाले आहे. पूर्वी जर वाळू गटाच्या लिलावाला संबंधीत ग्रा.पं.चा विरोध असेल तर प्रांताधिकाºयांच्या मंजुरीने वाळू गटाचा लिलाव केला जात असे. मात्र नवीन धोरणानुसार आता जर ग्रा.पं.चा विरोध असेल तर लिलाव करता येणार नाही. मात्र त्या वाळू गटातील वाळू चोरी होणार नाही, याची जबाबदारी संबंधीत ग्रा.पं.ची राहणार आहे. तसेच जर संमती दिली तर लिलावातून मिळणाºया महसूलाच्या २५ टक्के महसूल संबंधीत ग्रा.पं.ला मिळणार आहे.अवैध उपसा जोरात२१ वाळू गटांचा लिलाव झाला आहे. त्यापैकी घाडवेल या  वाळू गटाचा दुसºया टप्प्यात लिलाव झाला आहे. दुसºया टप्प्याला पूर्ण राज्यातच स्थगिती मिळालेली असल्याने या गटालाही स्थगिती मिळाली आहे. मात्र त्याआधीच लिलाव झालेल्या २० वाळू गटांपैकी केवळ ९ वाळू गट संबंधीत मक्तेदारांनी सर्व कायदेशिर प्रक्रिया पूर्ण केल्याने कार्यान्वित झाले आहेत. उर्वरीत मक्तेदारांनी अद्यापही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. दरम्यान अवैध वाळू उपसा मात्र जोरात सुरू आहे. गिरणा नदीपात्रातून तर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. मनपाच्या गिरणा पंपींग परिसरात नदीपात्रातून रात्रंदिवस अवैधपणे वाळू उपसा करून वाळूचे ट्रॅक्टर व डंपर यांची रामानंदनगर घाटातून बंदी असतानाही बिनधास्तपणे वाहतूक सुरू आहे. ना पोलिस, ना महसूल यंत्रणा कोणीही कारवाईस धजावत नसल्याचे चित्र आहे.