जामनेर : नगरपालिकेकडून शहरात प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा साठविण्यासाठी कचरा कुंडीचे वाटप गुरुवारी नगराध्यक्ष साधना महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यासाठी २० हजार कुंड्या घेण्यात आल्या. बजरंगपूर भागात प्रातिनिधिक स्वरूपात ५० कुटुंबांना कचरा कुंड्यांचे वाटप झाले.यावेळी संतोष सराफ व सहका-यांनी पथनाट्य सादर केले. शुक्रवारपासून कुंडी वितरण केले जाणार असून नागरिकांकडून हमी पत्र भरून घेतले जाणार आहेत.यावेळी उपनगराध्यक्ष अनीस शेख, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, आतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, प्रमोद वाघ, कैलास नरवाड़े, उल्हास पाटील, लीना पाटील, शीतल सोनवणे, मंगला माळी, ज्योति पाटील, रमेश हिरे, दत्तू जोहरे, राहुल तळेले, ईश्वर पाटील, दुर्गेश सोनवणे, अनुजा जैसवाल आदी उपस्थित होते.
जामनेर येथे पालिकेकडून कचरा कुंड्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 21:46 IST