यावेळी माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुर पाटील, दिव्यांग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र लोटन पाटील, तहसीलदार अनिल गवांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील ८५ अपंग बांधवांना पिवळी शिधापत्रिका देण्यात आली. या सर्व ८५ दिव्यांग व अपंग बांधवांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्याचबरोबर पारोळा तालुक्यातील आदिवासी बांधवांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी समाजातील सर्व घटकांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचवा, अपंग व दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना प्रशासनाला केल्यात. कृउबाचे संचालक मधुकर पाटील, प्रा. बी.एन.पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य कैलास पाटील, दादा पाटील, गायत्री महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.