शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाळधी येथे लाभार्थींना वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 00:49 IST

पाळधी येथे विविध खात्याच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यांसह मदतीचे वाटप करण्यात आले.

धरणगाव : महाराजस्व अभियान हे सर्वसामान्यांसाठी वरदान असून, पाळधी येथे विविध खात्याच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यांसह मदतीचे वाटप करण्यात आले.उद्‌घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, सरपंच प्रकाश पाटील, चंदू माळी, अनिल कासट, चंदन कळमकर, सचिन पवार आदी उपस्थित होते.पुरवठा, संजय गांधी, निराधार योजना, कृषी, आरोग्य, विमा लाभ, आधार नोंदणी, सीएससी केंद्र, पंचायत समिती विभाग, रक्तदान शिबिर असे विविध स्टॉल लावण्यात आले होते.संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यात १५५ गटई स्टॉल मंजूर करण्यात आले. तालुक्यात २३ गटई स्टॉल वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब योजने अंतर्गत तालुक्यातील २८ महिलांना ,वीस हजार रुपयांचे असे ५ लाख ६० हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत तालुक्यातील ४ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी १ लाख १८ हजार ७४० रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रमाणपत्र , रोजगार हमी योजनेअंतर्गत ४७१ जॉब कार्डचे वाटप करण्यात आले. उत्पन्न दाखले , डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट, विविध दाखले वाटप करण्यात आले२४ व्यक्तींनी रक्तदान केले असून त्यांना पालकमंत्री व रेडक्रॉस सोसायटी यांच्यामार्फत विमा संरक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. वराड बुद्रूक आव्हानी, बोरखेडा, हनुमंतखेडे, पष्टाने , पाळधी, पिंप्री अशा ठिकाणी कोरोना तपासणी कॅम्प घेण्यात येऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली.सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी केले तर आभार तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकDharangaonधरणगाव