शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात अंतर्नादतर्फे गरजूंना फराळ, कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 14:23 IST

मोलमजुरी करून पोटाची खडगी भरणाऱ्यांना अंतर्नाद प्रतिष्ठानने १२ कुटुंबातील ४५ जणांना फराळ, लहान मुला मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेसचे वाटप केले.

ठळक मुद्दे१२ कुटुंबातील ४५ व्यक्तींना फराळ, नवीन कपडे वाटपयंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष

भुसावळ : मोलमजुरी करून पोटाची खडगी भरणाऱ्यांना अंतर्नाद प्रतिष्ठानने दिवाळीच्यानिमित्ताने १२ कुटुंबातील ४५ जणांना फराळ, लहान मुला मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेसचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. हे सर्व कुटुंब नहाटा कॉलेज परिसरात वास्तव्याला आहेत.ह्यवाटीभर फराळ अन्‌ नवीन कपडे देवून वंचितांची दिवाळी गोड करू याह्ण या उक्तीला अनुसरून अंतर्नाद प्रतिष्ठान गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. उपक्रमांतर्गत जी मदत गोळा झाली ती गरजूंपर्यंत तीन-चार दिवसात पोहचवण्यात आली. दिवाळीच्या आदल्या दिवशी अंतर्नादतर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा या आदिवासी वस्तीवरसुद्धा ४५० जणांना नवीन कपडे, फराळ, शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते. यानंतर नहाटा कॉलेजसमोरील परिसरात अनेक दिवसांपासून मोलमजुरी करणारे कुटुंब राहतात. सण असो की उत्सव त्यांच्यासाठी तो असून नसल्यासारखा असतो.अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांना या परिवारासंदर्भात माहिती झाल्यानंतर अंतर्नादच्या सदस्यांनी या कुटुंबांची आर्थिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर बुधवारी त्यांची भेट घेऊन त्यांना फराळ, नवीन कपडे, चादर व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. संस्था सदस्य रोहिदास सोनवणे यांची मुलगी डॉ.तेजश्री सोनवणे यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाच लहान मुलांना नवीन ड्रेसचे वाटप केले.याप्रसंगी अमितकुमार पाटील, रोहिदास सोनवणे, समाधान जाधव, तेजेंद्र महाजन, जीवन सपकाळे, दीपक फालक, अमित चौधरी, सचिन पाटील, डॉ.तेजश्री सोनवणे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.

टॅग्स :DiwaliदिवाळीBhusawalभुसावळ