शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांच्या साहित्याचे आरोग्य यंत्रणेला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 20:09 IST

भुसावळ तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे.

ठळक मुद्देकोरोनासोबत लढण्यासाठी यंत्रणा झाली सज्जतालुक्यातील चारही केंद्र, पालिका रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये वितरण

भुसावळ : तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निधीतील ५० लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. सोमवारी किन्ही आरोग्य केंद्रातून चारही आरोग्य केंद्राला या साहित्याचे वितरण करण्यात आले. यामुळे कोरोनासोबतच दोन हात करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आता सज्ज झाली आहे.तालुक्यातील प्राथमिक, ग्रामीण, पालिका आरोग्य केंद्रासाठी आमदार संजय सावकारे यांच्या विशेष निधीतून ५० लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रासाठी या साहित्याचे वितरण करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागाला कोरोनाच्या लढ्यात आवश्यक असलेले पीपीई किट, एन ९५ मास्क, हँड सॅनिटायझर, सर्जिकल मास्क आदींसह अन्य औषधी, साहित्यांची वाटप केले. मुबलक प्रमाणात औषधांचा साठाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तालुक्यातील चारही केंद्र, पालिका रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, तालुका वैघकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे, किन्ही केंद्राच्या डॉ.कल्पना दंवगे. डॉ.साजीया शेख, पिंपळगाव केंद्राचे औषध निर्माता मनोहर कोळी, किन्ही येथील माजी सरपंच अरुण चौधरी, सर्वोदय हायस्कूलचे चेअरमन सुरेश येवले, पंढरी बोंडे, दिलीप सुरवाडे, पोलीस पाटील राजू तायडे, संजय सुरवाडे, किरण घुले यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.जिल्ह्यात भुसावळला प्राधान्यजळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम भुसावळ तालुक्यासाठी आमदार सावकारे यांनी शिफारस पत्र दिल्यामुळे या साहित्याची उपलब्धता लवकर झाली. जिल्ह्यात कोरोना निमुर्लनासाठी सर्वांत प्रथम भुसावळ तालुक्याला ही सामग्री मिळाली आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटोळे यांनी दिली.यंत्रणेचे बळकटीकरणभुसावळ तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रासाठी २० लाखांचे व दोन ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी २० लाख तर पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयासाठी १० लाख असे एकूण ५० लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यामुळे भुसावळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ