शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दोन दिवसात 10 कोटींच्या 200च्या नोटांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 12:01 IST

200 रुपयांच्या नोटांबाबत शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता

ठळक मुद्देएकाच दिवसात 6 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या या नोटांचे वाटपस्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून शहरासह जिल्ह्यातील बँकांना नोटा देण्यात आल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 -चलनात आलेल्या 200 रुपयांच्या नोटांबाबत शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होऊन त्या मिळविण्यासाठी बँकामध्ये गर्दी झाली. मंगळवारी एकाच दिवसात 6 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या या नोटांचे वाटप करण्यात आले. सोमवार व मंगळवार मिळून 10 कोटी 72 लाख रुपये किंमतीच्या 200 रुपयांच्या नोटांचे वितरण झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने नवीन नोटांचे पूजन करावे, यासाठी अनेकांनी या नोटा मिळविण्यासाठी बँकामध्ये गर्दी केली होती.स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून शहरासह जिल्ह्यातील बँकांना नोटा देण्यात आल्या व याच शाखेमध्येही ग्राहकांना नोटा देण्यासह बदल करूनही देण्यात आल्या. शनिवारीच स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत 200 रुपये किंमतीच्या 15 लाख नोटा दाखल झाल्या होत्या. मात्र दुस:या शनिवारची सुट्टी व दुस:या दिवशी रविवार असल्याने सोमवारपासून या नोटांचे वाटप सुरू झाले. यामध्ये सोमवारी 4 कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या नोटांचे वितरण करण्यात आले. मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने नवीन नोटांचे पूजन करण्याच्या भावनेने या नोटांना अधिक मागणी वाढली. त्यामुळे आज एकाच दिवशी 6 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या नोटांचे वितरण करण्यात आले.