आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या मदतीच्या ४४३ कोटी १९ लाखांच्या प्रस्तावापैकी ११८ कोटी १९ लाखांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने हे अनुदान तत्काळ तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना वितरीत केले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.गतवर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी विभागाने बोंडअळी समुळ नष्ट करण्यासाठी कपाशी उपटून फेकण्याचे आवाहन केले होते.बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांनी शासनाकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे करीत अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ४४३ कोटी १९ लाख ४७ हजार रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.शासनाने या अनुदानाचा पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यात जिराईतसाठी हेक्टरी ६ हजार ८०० तर बागाईत क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. प्राप्त झालेली ११८ कोटी १९ लाखांची रक्कम तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली आहे. तहसीलदारांना लाभार्थ्यांची यादी व वाटप व प्रदान करण्यात आलेली रक्कम संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना केली होती.
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीच्या नुकसानीचे ११८ कोटींचे अनुदान वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:42 IST
पहिला हप्ता प्राप्त
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीच्या नुकसानीचे ११८ कोटींचे अनुदान वितरीत
ठळक मुद्दे ४४३ कोटी रुपयांच्या मदतीचा होता प्रस्तावरक्कम संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना