शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विकासामधील मतभेदांचा खोडा झाला दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:55 IST

जि. प. अध्यक्षांनी घडवला समन्वय: 40 कोटींची विविध कामे लागणार मार्गी

ठळक मुद्देकामांची यादी देण्यावर एकमतविरोधकांनाही केले सहभागी
जळगाव: जिल्हा परिषदेत सत्ताधा-यांच्या आपसातील मतभेदामुळे गेल्या 9 महिन्यात कामांचे नियोजनच न झाल्याने 40 कोटींचा निधी तसाच पडून असल्याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी 15 रोजी दुपारी खास बैठक बोलावून सर्वामध्ये समन्वय घडवून आणला. यामुळे आता अनेक कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा नियोजन कडून जिल्हा परिषदेला आलेला 20 कोटींचा निधी आणि रस्त्यांच्या कामासाठीचा 20 कोटींचा असा एकूण 40 कोटींचा निधी तब्बल 9 महिने उलटले तरी खर्ची पडला नाही. वादामुळे जिल्ह्यातील विकास कामांना खिळ बसत असल्याचे पाहून शुक्रवारी जि.प अध्यक्षांनी समन्वयाने विकास कामांचे नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. त्यांच्या शासकीय निवासस्थानावर झालेल्या या बैठकीत गटनेते तसेच विभाग प्रमुखाची उपस्थिती होती. सदस्यांमध्ये असलेले मतभेद व वाद पहाता अध्यक्षांनी समन्वय घडवून या बैठकीत यश मिळवत 31 मार्चपयर्ंत निधीचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.कामांची यादी देण्यावर एकमतडीपीडीसीकडून जिल्हा परिषदेला यावर्षी 51 कोटीचा निंधी मंजूर झाला आहे. शासन निर्णयानुसार या निधीस 30 टक्के कात्री लागली असल्याने यावर्षी 37 कोटीचा निधी खर्च करता येणार आहे. मात्र त्यात देखील मागील देणी 17 कोटीची असल्याने हाती 20 कोटी निधी राहणार आहे. याचबरोबर यावर्षी शासनाकडून जिल्ह्यातील ग्रामिण रस्ते व जिल्हा मार्ग यासाठी देखील 20 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या 40 कोटीच्या निधीच्या खर्चासाठी नियोजन करण्यावर पदाधिकारी व गटनेत्यांमध्ये चर्चा बेैठकीत करण्यात येवून 31 डिसेंबर पयर्ंत कामांची यादी देण्याचे सर्वानुमते ठरले.50 लाखांवरील कामांबाबत निर्णय पेंडींग9 ऑक्टोबरच्या शासनाच्या अध्यादेशानुसार 50 लाखावरील कामे सर्वसाधारण सभेत मंजूर करण्याच्या सूचना असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने या अध्यादेशानुसारच कामे होतील,तसेच यादी सभेत ठेवावी लागेल अशी भूमिका घेतली तर यास सत्ताधा:यांनी नापसंती व्यक्त केली. मात्र शेवटी कामांची यादी मंजुर करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यावर चर्चा करण्यात आली. मात्र काँंग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेने हा निर्णय सभेत घेवू असे सांगितले.दरम्यान प्रशासनाकडून विविध विभागाच्या विकास कामांची यादी तात्काळ दिल्यास ती सभेपुढे ठेवता येईल व त्यामुळे कामाचे नियोजन पदाधिका:यानी तात्काळ करावे, जेणेकरून सभेत मंजुरी घेतल्यानंतर या कामांना प्रशासकीय मान्यता देवून टेंडर प्रक्रिया करता येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले. विरोधकांनाही केले सहभागीशिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सभागृहात सत्ताधा:यांची नेहमी कोंडी होत असल्याने निधी खर्चात समन्वय साधला जावा यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे व शिवसेनेचे नानाभाउ महाजन, कॉंग्रेसचे प्रभाकर सोनवणे यांनाही बैठकीस बोलावण्यात आले होते. यावेळी सभापती पोपट भोळे यांच्यासह अति.मुख्यकारी अधिकारी संजय मस्कर व विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.