शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा विकास मंचच्या नाराज दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 17:24 IST

विशेष सभेला दांडी मारत नगरसेवक पद्मालय येथे गणेश दर्शनाला

ठळक मुद्देचोपडा नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजनसत्ताधारी विकास मंचच्या नगरसेवकांमध्ये उघड दोन गटनाराज असलेले नगरसेवक गेले पद्मालय येथे देवदर्शनाला

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि. ५ : नगरपालिकेत ५ रोजी विशेष सभा होती. मात्र सत्ताधारी विकास मंचच्या २१ नगरसेवकांपैकी नाराज असलेल्या दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे पाठ फिरवित एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथे जात गणेश दर्शन घेतले.           चोपडा नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेत विविध समिती सदस्यांचे नामनिर्देशन होणार होते. मात्र सत्ताधारी विकास मंच मध्ये उघड उघड फूट पडल्याने नऊ नगरसेवक आणि एक सहयोगी नगरसेवक बाहेर गावी रवाना झाले होते. मात्र असे असले तरी उर्वरित सत्ताधारी विकास मंचच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन विविध समिती सदस्यांना नाम निर्देशित केले आहे .सभेसाठी कोरम पूर्ण असल्याने सभा तहकूब होण्याची नामुष्की मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थिती दिल्यामुळे सध्यातरी टळली आहे. कोणत्याही निर्णयात विचारात घेतले जात नाही व कामकाजात मनमानी चालते, फक्त दोन ते तीन लोकच नगर पालिका चालवितात असा आरोप करीत या नगरसेवकांनी पाठ फिरविली.चोपडा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र मिळून विकास मंचतर्फे निवडणूक लढविली होती. त्यात विकास मंचतर्फे वीस नगरसेवक आणि एक अपक्ष निवडून आलेले आहेत. परंतु विकास मंच चे सहयोगी सदस्य असे २१ नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडलेले आहेत. सत्ताधारी विकास मंच च्या नगरसेवकांमध्ये उघड उघड दोन गट पडल्याने दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे पाठ फिरवून बहिष्कार टाकला. त्यानंतर पद्मालय येथे दर्शन घेण्यासाठी निघून गेले होते.विशेष सभेत पाणीपुरवठा समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती, महिला व बालकल्याण समिती व इतर समित्यांसाठी सदस्य निर्देशित केले जाणार होते. मात्र नाराज नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट निर्माण करून आज सभेच्या ठिकाणी न जाता बाहेर गावी जाणे पसंत केले. यामुळे सत्ताधारी विकास मंचमध्ये फूट पडली आहे.सभेचे पीठासन अधिकारी तथा तहसीलदार दीपक गिरासे होते. तर त्यांना साहाय्य मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले. सभेला लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषा चौधरी, हितेंद्र देशमुख, रमेश शिंदे, कृष्णा पवार, गटनेते जीवन चौधरी, रुक्साना शाईन सय्यद काझी, भूपेंद्र गुजराथी, उपनगराध्यक्षा सीमा श्रावगी, दीपाली चौधरी, नसीम बानो जहिरोद्दीन, हुसैन खाँ पठाण खा, प्रकाश मोहन पाटील, अश्विनी गुजराथी तर शिवसेनेचे गटनेते महेश पवार, किशोर चौधरी, राजाराम पाटील, महेंद्र धनगर, लताबाई पाटील, मिनाबाई शिरसाठ उपस्थित होते.हे नगरसेवक गेले पद्मालय येथे देवदर्शनालानाराज असलेले सुप्रिया सनेर, सुरेखा माळी, विमलबाई साळुंखे, शोभाबाई देशमुख, कैलास सोनवणे, सरला शिरसाठ, अशोक बाविस्कर, गजेंद्र्र जयस्वाल, नारायण बोरोले, डॉ.रवींद्र पाटील हे १० नगरसेवक पद्मालय येथे चतुर्थीनिमित्त दर्शन घेण्यास गेले होते. तर शिवसेनेच्या संध्या महाजन आणि मनीषा जयस्वाल या दोन नगरसेविका अनुपस्थित होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा