शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जामठी येथे अंत्यविधीच्या जागेवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:58 IST

जामठी येथे बौद्ध समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधी करण्याच्या जागेवरून वाद झाला.

विकास पाटीलजामठी, ता.बोदवड : जामठी येथे बौद्ध समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधी करण्याच्या जागेवरून वाद झाला. संबंधितांनी ग्रामपंचायतीसमोर खड्डे खोदून अंत्यविधी करण्याची तयारी करीत असतानाच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर वाद मिटला. रविवारी दुपारपर्यंत हा वाद सुरू होता.बौद्ध समाजातील एका १२ वर्षाच्या मुलीचे रविवारी निधन झाले. पूर्वापार आतापर्यंत गावाजवळील बेटावद रस्त्यावरील एका जागेवर अंत्यविधीला खड्डे खोदण्यासाठी समाजबांधव सकाळी गेले. मात्र देवराम बळीराम माळकर व अशोक नामदेव माळकर या शेतकऱ्यांनी ही जागा आपली असल्याचा दावा केलाल तर दुसरीकडे या शेतकऱ्यांनी या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप बौद्ध समाजबांधवांनी केला. यामुळे बौद्ध समाजबांधवांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालय गाठले व कार्यालयासमोरच अंत्यविधीसाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. यामुळे येथे हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली. ही माहिती पोलिसांना समजताच पोलीस ताफा जामठीमध्ये दाखल झाला.पोलिसांनी शेतकºयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शेतकरी, जमावात शाब्दीक चकमक उडाली. अखेर पूर्वीच्याच जागी खड्डे खोदण्याचा निर्णय झाला आणि पोलिसांनी प्रकरण शांत केले.मुलीचा अंत्यविधी २१ रोजी सकाळी ९ वाजता करणार आहे. त्या मुलीचे वडील व आजी बाहेरगावी मुंबईवरून येत असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.कोण, काय म्हणाले?आमची शेती वडिलोपार्जित शेती करत असून, आम्ही कुठेही अतिक्रमण केले नाही व स्मशानभूमीस आमचा विरोध नाही. तसेच या जागेसंदर्भात पुरावे असल्यास आम्ही देण्यास तयार आहे. त्यांनी शेतीची मोजणी करून घ्यावी.-अशोक नामदेव माळकर, जागा मालक शेतकरी, जामठीअंत्यविधीसाठी परंपरेप्रमाणे पूर्वीच्या जागेवर खड्डा करण्यासाठी गेले असता शेतकºयाने आम्हाला विरोध केला. आमच्या स्मशानभूमीच्या जागेअभावी आम्ही ग्रामपंचायतीसमोर खड्डा करून दफन क्रिया करत होतो. पोलिसांनी मध्यस्थी करून शेतात खड्डा केला.-सुरेश सुरवाडे, समाज बांधव, जामठी

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBodwadबोदवड