शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरात बनावट मिठ साठ्याची लावली विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:59 IST

जामनेरात बनावट मिठ साठ्याची व्यापाऱ्यांनी विल्हेवाट लावल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या कारवाईने व्यापारी सावधमहसूल विभागाकडून तपासणी

जामनेर  :  टाटा मिठाचा बनावट साठा येथील मयूर ट्रेडर्समधून गुरुवारी पोलिसांनी जप्त केल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर सावध झालेल्या इतर दुकानदारांनी त्यांच्याकडील बनावट मिठाच्या साठ्याची विल्हेवाट लावल्याची माहिती मिळाली आहे.कोमल एजन्सीकडून आणखी कोणी मिठाचा साठा घेऊन त्याची विक्री केली याबाबत पोलीस तपास करीत आहे. मोहम्मद हुसेन चौधरी (रा.जोगेश्वरी, पश्चिम, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार प्रकाशचंद कावडिया (रा.बजरंगपुरा, जामनेर) यांच्या कोमल एजन्सी दुकानातून व बाजार समितीच्या दुकान नंबर १६ मधून ३ लाख १२ हजार रुपये किमतीच्या बनावट टाटा सॉल्ट कंपनीच्या ३१२ गोण्या जप्त केल्या. टाटा सॉल्ट कंपनीचे स्वामित्व अधिकाराचे उल्लंघन करून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने भादंवि कलम ४८२, ४८६, प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (सुधारित अधिनियम १९८४ व १९९४ चे कलम ५१, ६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन काळात शहरातील काही किराणा व्यावसायिक भेसळ केलेल्या खाद्य तेलाचा साठा करीत असून, त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. महसूल विभागाने तपासणी केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खुलेआम तेल विक्री सुरूच राहिली. राजकीय अभय असल्याने अशा व्यापाऱ्यांना कारवाईची भीती नाही. जामनेर येथून तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे किराणा दुकानदार तेल, मीठ विक्रीसाठी नेतात. बनावट मीठ व भेसळयुक्त तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळाला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. काही नागरिक याबाबत ग्राहक न्यायालयात  दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :businessव्यवसायJamnerजामनेर