जळगाव : प्रशासनाकडून नागरिकांमध्ये साफसफाईबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबविले जात असतानच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने मनपाकडून मात्र शहरातील गोळा केलेला कचरा त्या-त्या भागातच ठराविक ठिकाणी उघड्यावर टाकून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
शहरातून दररोज १00 ते १२0 टन कचरा गोळा करून या प्रकल्पावर नेला जातो. मात्र प्रकल्प बंद असल्याने कचर्यावर प्रक्रिया होत नसल्याने गेल्या दीड वर्षांपासून हजारो टन कचरा या प्रकल्पाच्या आवारात जमा झाला आहे.
त्यामुळे प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासूनच कचर्याचे मोठे ढीग साचले आहेत. ते पेटवून देण्यात येत आहेत. तर काही ढीग आपोआपच पेट घेत आहेत. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २000 नुसार घनकचरा प्रकल्प अचानक बंद करता येत नाही. कारण त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कचर्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसाकाठी या प्रकल्पात जमा होणार्या १00 ते १२0 टन कचर्याची त्याच रात्री प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते. कारण हा कचरा जर जास्तवेळ पडून राहिला तर त्यातून C2H2 म्हणजेच ग्रीन गॅस( मार्श गॅस) तयार होतो. त्याचा वातावरणातील O3 शी संयोग होऊन CO2 (कार्बनडाय ऑक्साईड) व H2O (पाणी) तयार होते. ते देखील वातावरणास घातक आहे. त्यामुळे कचरा पडून न राहू देता त्यावर तातडीने प्रक्रिया केली जाते. मात्र सुमारे दीड वर्षांपासून प्रकल्प बंद असून तेथे शहरातील कचरा मात्र दररोज जमा होत आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो टन कचरा प्रक्रियेविनाच पडून आहे.
-------------
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दीड वर्षांपासून बंद पडला आहे. कचर्याचे ढीगच्या ढीग साठले आहे. त्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातून विषारी वायूचे उत्सर्जन वातावरणात सुरू आहे. त्यामुळे या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र मनपा प्रशासन ढीम्म आहे. यादृष्टीने काहीही हालचाली अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. जुनी न.पा.च्या जागेवरील खड्डय़ात मनपातर्फे कचरा टाकून पेटवून देण्यात येत आहे. शहरातील कचरा हंजीरच्या जागेत नेऊन टाकला जात असल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे डंपींग ग्राऊंड बनले आहे. आता तर तेथे कचरा टाकण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मेहरूण व परिसरातील कचरा मेहरूण तलावाच्या सांडव्याच्या काठावर टाकण्याचे उद्योग आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. तसेच स्मशानभूमीजवळ, मिल्लतनगर समोरील (अक्सानगर) रस्त्यावर, प्रजापतनगर या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या कचर्यातून निघणार्या विषारी वायू व दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्रास जाळला जातो कचरा घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २000 नुसार कचर्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असून कचरा जाळणे गुन्हा आहे. मात्र तरीही सर्रास कचरा पेटवून दिला जात आहे. त्यामुळे सफाई मोहिमेबरोबरच याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.