शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा आता शेतावर व्हावी - संपाबाबत नेटिझन्सचा सूर

By admin | Updated: June 3, 2017 19:05 IST

बळीराजाच बळी दिला जात असल्याने संतापाची लाट संप मागे घेतल्यानंतरही कायम

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 -  कर्ज असो वा हमीभाव यासाठी जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच बळी दिला जात असल्याने संतापाची लाट  संप मागे घेतल्यानंतरही कायम असून या बाबत सोशल मीडियावर सकाळपासून ‘चर्चा आता वर्षा बंगल्यावर नको, शेतावर व्हावी..’ असे वेगवेगळे संदेश फिरत आहे. कजर्माफीचा प्रश्न असो वा शेतमालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्न असो, यासाठी शेतकरी वेठीस धरला जात असल्याने शेतक:यांनी 1 जूनपासून संप पुकारला. या संपाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले. अखेर  कोअर कमिटीच्या सदस्यांची सरकारशी चर्चा होऊ हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या नंतरही सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले. मुख्यमंत्री गोड बोलून वेळ मारून नेतातशेतक:यांशी चर्चा होऊन संप मागे घेतला असला तरी यामध्ये मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवत ‘मुख्यमंत्री गोड बोलून वेळ मारून नेतात’, असे संदेश पाठविले जात आहे. सोबतच आता आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात शेतक:यांच्या पदरात काय पडेल, हे सांगता ये नाही याची शाश्वती नसल्याचा सूर उमटत आहे. शेतक:यांनी सावध रहायला हवेसरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण करीत सरकारने निवडणुकीपूर्वी शेतक:यांबाबत सकारात्मक चित्र निर्माण केले होते. मात्र सत्ता मिळताच सरकारने शब्द फिरविले असल्याने शेतक:यांनी आताही सावध रहायला हवे, असे आवाहन केले जात आहे. विश्वास ठेवू नकासरकारने अल्प भूधारक शेतक:यांना कजर्माफीची घोषणा केली असली तरी ती प्रत्यभात मिळेल की नाही याबाबत विश्वास न ठेवण्याचा उल्लेख करीत आता चर्चा बंगल्यावर नको, शेतावर व्हावी, असे आवाहन केले जात आहे. संपादरम्यान कोअर कमिटीचे सदस्य फुटल्याचा आरोप करीत संपाबाबत संभ्रम असल्याचे, शेतक:यांना संप मागे घेतल्याचा निर्णय अमान्य असेही छोटे, मोठे संदेश व डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची यादी व त्यासाठी लिंकही शेअर केली जात आहे. मुख्यमंत्र्यांची चित्रफितनिवडणुकीपूर्वी भाजपाने काढलेल्या दिंडी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक:यांची बाजू घेत तत्कालीन सरकराला शेतकरी धडा शिकवतील, असे वक्तव्य केले होते. ही चित्रफीतही फिरत आहे. सरकारचे समर्थनया अविश्वासाच्या संदेशासह सरकारचे समर्थन करणारेही संदेश फिरत आहे. यामध्ये सरकारने केलेले काम, आताच्या बोलणीमध्ये झालेले मुद्दे मांडले जात आहे. जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे डिजिटलायङोशनसोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता सर्वत्र आपापली माहिती शेअर करण्यासाठी याचा पुरेपूर वापर केला जात आहे. यामध्ये जळगाव जिल्हा माहिती कार्यालयानेही याचा स्वीकार करीत आपली माहिती, शासकीय उपक्रम, दररोजच्या बातम्या शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर लिंक पाठविली जात आहे.