शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हाघिकाऱ्यांच्या बदलीची पुन्हा चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:27 IST

जळगाव : कोरोनाच्या उपाययोजनांसदर्भात वेगवेगळे आरोप होऊन जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा दावा सध्या केला जात आहे. ...

जळगाव : कोरोनाच्या उपाययोजनांसदर्भात वेगवेगळे आरोप होऊन जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा दावा सध्या केला जात आहे. यामध्ये शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाल्याची पुन्हा चर्चा रंगली. विशेष म्हणजे त्यांच्या जागेवर येणाºया अधिकाºयांचे नावही जाहीर होऊन त्यांच्या छायाचित्रासह अभिनंदनाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. या बदलीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी इन्कार केला असून आपल्यापर्यंत असे आदेश आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या बदलीची या पूर्वी अनेक वेळा चर्चा रंगली आहे. दोन-तीन महिन्यातून अशी चर्चा होत असल्याचे वारंवार समोर आले. त्यात आता कोरोना बाधित वृद्धेचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व इतर अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचीही बदली झाल्याची शनिवारी सकाळपासून जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांच्या जागेवर सांगली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती झाल्याचीही चर्चा रंगून त्यांच्या छायाचित्रासह अभिनंदन होऊ लागले व तसे संदेश व्हायरल झाले.मात्र या संदर्भात राऊत यांनाही आदेश मिळालेले नव्हते व इकडे जळगावातही तसे आदेश नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.अद्यापपर्यंत बदलीचे आदेश नाही. सामान्यांच्या हितासाठी आपण काम करीतच राहणार आहे.- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Jalgaonजळगाव