शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

उमविच्या प्र-कुलगुरुपदासाठी बोरसे व माहुलीकर यांची नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:23 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदासाठी प्रा.अमुलराव बोरसे व प्रा.पी.पी.माहुलीकर यांची नावे चर्चेत आहे. या दोन्हींपैकी एकाची निवड प्र-कुलगुरुपदी आठवड्याभरात राज्यपालांकडून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देआठवड्याभरात होणार घोषणा कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकतासप्टेंबर महिन्यात राज्यपालांकडे पाठविली होती नावे

आॅनलाईन लोकमत

अजय पाटीलजळगाव,दि.२७-उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदासाठी प्रा.अमुलराव बोरसे व प्रा.पी.पी.माहुलीकर यांची नावे चर्चेत आहे. या दोन्हींपैकी एकाची निवड प्र-कुलगुरुपदी आठवड्याभरात राज्यपालांकडून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

नवीन विद्यापीठ कायद्याअंतर्गत विद्यापीठासाठी प्र-कुलगुरुपद हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यपालांकडून या पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे. राज्यातील कोल्हापूर, पुणे व मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाची निवड यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी उत्सुकता  आहे. दरम्यान, विद्यापीठाकडून सप्टेंबर महिन्यातच चार जणांची नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती. उमविकडून पाठविण्यात आलेल्या चार नावांपैकी प्रा.अमुलराव बोरसे व प्रा.पी.पी.माहुलीकर यांची नावे सर्वात आघाडीवर आहेत.

१. कोण आहेत प्रा.अमुलराव बोरसे?उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक म्हणून प्रा.अमुलराव बोरसे यांनी काम पाहिले आहे.  विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून काही काळ त्यांच्याकडे पदभार होता. आॅगस्ट २०१७ मध्ये ते विद्यापीठातून निवृत्त झाले. निवृत्त होण्याअगोदर ते विद्यापीठाच्या स्कूल आॅफ केमिकल सायन्सेस प्रशाळेतील आॅरगॅनिक केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

२. विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकरउत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या स्कूल आॅफ केमिकल सायन्सेस प्रशाळेचे प्रमुख म्हणून प्रा.माहुलीकर यांनी काही काळ काम पाहिले. त्यानंतर उमविच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे (बी.सी.यु.डी.) संचालक म्हणून काही वर्षे काम पाहिले. नवीन विद्यापीठ कायदा आल्यानंतर बीसीयुडी विभाग रद्द झाल्यानंतर विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून प्रा.पी.पी.माहुलीकर हे काम पाहत आहेत.