शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांविषयी शेकोटीभोवती चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 14:26 IST

आगामी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची चर्चा व उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

भालोद, ता.यावल : आगामी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची चर्चा व उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ग्रामपंचायत निवडणुका जानेवारी महिन्‍याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात आहेत. यामुळे इच्छुक उमेदवार वार्डातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन करीत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसा इच्छुकांमधील उत्साह वाढत आहे. मात्र शासनाकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या आदेशानुसार निवडणुकांनंतर सरपंच आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंच पदासाठी इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. कोणत्या प्रवर्गातून सरपंच आरक्षण निघेल अशी उत्सुकता इच्छुकांमध्ये आहे.गेल्या पंचवार्षिकीत सरपंच अनुसूचित जाती एस.सी.प्रवर्गातील महिला होत्या, तर आता एसटी प्रवर्गातील पुरुषासाठी सरपंच पद असेल, अशीही चर्चा ग्रामस्थांमधून होताना दिसून येत आहे. सध्या ठिकठिकाणी ग्रामस्थ शेकोटी भोवती बसून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या चर्चांना ऊत आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत किती पॅनल असतील, किती उमेदवार असतील, त्यांची रचना करणे अशा महत्त्वाच्या बाबींकडे पॅनल प्रमुख यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही यावेळेस लढतीत मोठी चुरस असणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जसजशा निवडणुका जवळ येत आहे तसतशी रंगत वाढत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतYawalयावल